scorecardresearch

वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर काय परिणाम होतो? जाणून घ्या अशावेळी काय करावे

वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं खराब होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी जाणून घ्या

वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर काय परिणाम होतो? जाणून घ्या अशावेळी काय करावे
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या (Photo: Freepik)

वीज पुरवठा अचानक बंद झाल्याने सर्व कामं ठप्प होतात. वीज पुरवठा बंद झाल्याने आपल्या कामांसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही त्याचा परिणाम होतो, हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. अनेकवेळा आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणं तसेच सुरू ठेवतो, ज्यामुळे त्यांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता असते. अशावेळी काय करावे, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर काय करावे जाणून घ्या

  • इलेक्ट्रॉनिक उपकरणांना वीजपुरवठा होणारे स्विच बंद करा. जेणेकरून वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर अचानक पॉवर सप्लाय थेट सुरू होणार नाही. काहीवेळा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर तो पुर्ण क्षमतेने सुरू होत नाही, त्यामध्ये कमी जास्त प्रमाण आढळते. जे काही वेळाने सामान्य होते. पण वीजपुरवठा सुरू झाल्यावर थेट उपकरणांपर्यंत पोहोचला तर त्यामुळे ती उपकरणं खराब होण्याची किंवा त्यात बिघाड होण्याची शक्यता असते.
  • एखादी लाईट सुरू ठेवा जेणेकरून वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे ते तुम्हाला समजेल.
  • जर इतर ठिकाणी किंवा शेजाऱ्यांकडे वीज पुरवठा सुरळीत सुरू असेल तर फक्त तुमच्या येथील वीज पुरवठ्यामध्ये बिघाड झाला असण्याची शक्यता असून, तुम्ही त्याबाबत तक्रार दाखल करू शकता.
  • फ्रिज किंवा फ्रिजरमधील वस्तु वीज नसताना खराब होण्याची शक्यता असते. पण काही वेळासाठी फ्रिजमधील तापमान थंड राहते, तेवढा वेळ त्या वस्तुही चांगल्या राहू शकतात. यासाठी फ्रिज सतत उघडणे टाळा. फ्रिज सतत उघडल्याने त्यामध्ये बाहेरची गरम हवा जाते आणि वीज नसल्यामुळे फ्रिजमधील तापमान कमी करणे कठीण जाते.
  • जर तुमच्याकडे आईस बॉक्स असेल तर तुम्ही त्याच्यात खाद्यपदार्थ साठवू शकता.
  • बॅटरी, पॉवर बँक, मेणबत्ती अशा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर उपयोगी येणाऱ्या वस्तु आधीच घरात एका ठिकाणी ठेवा, ज्यामुळे अचानक वीज गेल्यानंतर तुम्हाला त्यांची मदत होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 11:02 IST

संबंधित बातम्या