स्मार्टफोनमधील वाढत्या Storage मुळे त्रस्त आहात? Google Photos मधील ‘या’ ऑप्शनचा करा वापर

गुगलच्या या सेवेचा वापर कसा करावा याची सविस्तर माहिती जाणून घ्या…

google photos
गुगल फोटो ट्रिक्स (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Google Photos ही गुगलद्वारे दिली जाणारी सेवा आहे. प्रत्येक Android स्मार्टफोनमध्ये गुगल फोटोज उपलब्ध असते. बहुतांश यूजर्स फोटो स्मार्टफोनमध्ये सेव्ह करण्याऐवजी ते गुगल फोटोजमध्ये सेव्ह करत असतात. यामुळे फोटोंची क्वालिटी कमी होते असे अनेकांना वाटत असते. खरंतर गुगल फोटो स्टोअर करताना ओरिजन क्वालिटी टिकून राहते. सध्या आकाराने मोठे असलेले फोटो देखील क्लाउड स्टोरेजमध्ये सेव्ह करता येतात. यामार्फत फोटोंसह अन्य फाइल्सचा बॅकअपदेखील घेता येतोय

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

गेल्या काही वर्षांमध्ये लोक गुगल फोटोजचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत आहेत. परिणामी त्यांच्या अकाउंटमधील जागा भरली जात आहे. Android प्रणाली सुरुळीतपणे काम करण्यासाठी स्मार्टफोनच्या स्टोरेजमध्ये ठराविक प्रमाणात जागा असणे आवश्यक असते. असे न केल्यास फोन योग्य पद्धतीने काम करत नाही. ही समस्या उद्भवू नये यासाठी Free Up Space ची मदत घेता येते.

Free Up Space चा वापर कसा करावा?

गुगल फोटोजमध्ये फोटोचा बॅकअप घेतल्यानंतर स्मार्टफोनमधील ओरिजनल फाइल्स हटवता येतात. स्टोअर केलेला डेटा (फोटो, व्हिडीओ, फाइल्स) क्लाउड आणि स्मार्टफोन अशा दोन ठिकाणांमध्ये असतो. गुगल फोटोजमधील ‘Free up space’ या टूलचा वापर करुन सुरक्षितपणे बॅकअप घेतलेली कोणतही फाइल डिलीट करता येते. या टूलचा वापर करुन स्टोरेजशी संबंधित समस्या दूर होतात.

आणखी वाचा – Google Maps ने लॉन्च केलेल्या ‘या’ फिचरमुळे नवीन शहरात फिरणे होणार सोपे, जाणून घ्या

Free Up Space वापरण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

  • गुगल फोटोज अ‍ॅप उघडा आणि त्यामध्ये Library टॅबवर क्लिक करा.
  • असे केल्यानंतर सुरु झालेल्या टॅबमध्ये वरच्या बाजूला Utilities असे लिहिलेले दिसेल.
  • त्यावर क्लिक केल्यावर Free Up Space हा ऑप्शन दिसेल.
  • त्यात लोकल फोटो कॉपी डिलीट करण्यासाठी या ऑप्शनवर क्लिक करा.

आणखी वाचा – गूगलचे AI टूल Bard जीमेलच्या डेटाचा वापर करतो? कंपनीने दिलं स्पष्टीकरण; म्हटलं…

नोट : ही प्रक्रिया सुरु झाल्यावर गुगलद्वारे क्लाउडमध्ये कॉपी असलेले फोटो काढून टाकण्यात येतील. स्मार्टफोनमधले लोकल फोटो सेफ राहतील. डेटाच्या आकारानुसार तो डिलीट व्हायला किती वेळ लागू शकतो हे ठरत असते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 18:44 IST
Next Story
Air Conditioner Difference: नवीन AC खरेदी करताय? जाणून घ्या इन्व्हर्टर एसी आणि स्मार्ट एसीमधील फरक
Exit mobile version