सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. चॅटजीपीटी हे गुगलशी स्पर्धा करत आहे. त्यामुळे गुगलची चिंता वाढली आहे. मात्र याच्याशी स्पर्धा करण्यासाठी गुगलने आपला BARD चॅटबॉट लॉन्च केला आहे.

ChatGPT ला टक्कर देण्यासाठी गूगल आपल्या AI वर वेगाने काम करत आहे. काही वापरकर्त्यांसाठी बार्ड सुरु करण्यात आले आहे. दरम्यान गुगलच्या AI टूलबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकांच्या जीमेल डेटाच्या आधारे प्रशिक्षण देण्यात आल्याचा दावा बार्डने केला आहे. बार्डचे हे वादग्रस्त उत्तर मायक्रोसॉफ्टचे संशोधक Kate Carwford यांनी ट्विटरद्वारे शेअर केले आहे.

हेही वाचा : 6G Network News: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ६ व्हिजन डॉक्युमेंटची घोषणा, म्हणाले, “भारत आज …”

जेव्हा केटने बार्डला चॅटबॉटचा डेटासेट काय आहे असे विचारले तेव्हा Google च्या AI टूलने उत्तर दिले की त्याचा डेटा विकिपीडिया, GitHub, Stack Overflow आणि Gmail यासह विविध सोर्समधून गेला आहे. या उत्तरावरून हे स्पष्ट झाले की गुगलच्या नवीन AI टूलला जीमेल डेटाच्या आधारे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसे असेल तर हा लोकांच्या गोपनीयतेशी मोठी हेळसांड आहे.

या विषयावर केटच्या ट्विटला उत्तर देताना गुगलने सांगितले की, बार्डला विकसित करण्याचे काम सुरु आहे. ज्यामध्ये त्याला भाषेच्या मॉडेल्सवर प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे सुरुवातीला यांच्याकडून चुका घडू शकतात. बार्डसाठी जीमेलवरून डेटा घेतला नसल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे. Bard आणि Chat GPT सारखी AI टूल्स तुम्हाला नेहमी योग्य उत्तर देत नाहीत त्यामुळे आपण सतर्क असणे आवश्यक आहे. कारण अनेकदा यामध्ये चुका होऊ शकतात. गुगलने स्वतः ब्लॉगपोस्टच्या माध्यमातून लोकांना याबाबत माहिती दिली आहे की AI टूल देखील अनेक वेळा चुकीची माहिती देऊ शकते.

बार्ड हे सध्या इंग्लंड आणि अमेरिकेतील निवडक वापरकर्त्यांसाठी सुरु करण्यात आला आहे. त्याची चाचणी सध्या सुरु असून, इतर लोकांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, ChatGPT ची नवीन सिरीज GPT-4 Open AI ने लॉन्च केली आहे. नवीन सिरीज पूर्वीपेक्षा जास्त प्रगत आहे. यामध्ये युजर्स फोटोच्या माध्यमातूनही प्रश्न विचारू शकतात.