दिल्लीमध्ये देशातील Apple च्या दुसऱ्या रिटेल स्टोअरची सुरुवात होणार आहे. Apple सीईओ टीम कूक स्टोअरचे उद्घाटन होणार आहे. परवा म्हणजेच १८ एप्रिल रोजी टीम कूक यांनी देशातील पहिल्या रिटेल स्टोअरचे उद्घाटन मुंबईमध्ये केले. दिल्लीमध्ये उभारण्यात आलेले हे रिटेल स्टोअर स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभारण्यात आले आहे. हे स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले आहे. आज सकाळी १० वाजल्यानंतर ग्राहक या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकणार आहेत. या स्टोअरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Apple चे देशातील दूर रिटेल स्टोअर हे दक्षिण दिल्लीमधील सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये तयार करण्यात आले आहे. मॉलमधील पहिल्या मजल्यावर असणारे हे स्टोअर मुंबईतील फ्लॅगशिप स्टोअरपेक्षा खूपच लहान आहे. मात्र येथे ग्राहकांना Apple ची सर्व प्रॉडक्ट्स बघायला मिळणार आहेत.

हेही वाचा : Apple First Retail Store Opening: मुंबईत सुरू झालेल्या देशातील पहिल्या अ‍ॅपल स्टोअरबद्दल जाणून घ्या ‘या’ १० प्रमुख गोष्टी

तसेच दिल्लीमधील या स्टोअरमध्ये ७० सदस्यांची टीम काम करणार आहे. ज्यामध्ये ते १५ भाषांमध्ये संवाद साधणार आहेत. ज्यामुळे खरेदीदाराला प्रॉडक्ट खरेदी करताना आपलेपणा वाटणार आहे. सर्वांसाठी खुले असेल असे एक स्टोअर असावे अशी आमची कल्पना होती असेन Apple रिटेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष डियर्डे ओब्रायन म्हणाले. आमची टीमचे सदस्य स्थानिक ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी आणि नवीन मार्ग शोधण्यात त्यांची मदत करण्यासाठी उत्सुक आहेत.

देशातील पहिले Apple रिटेल स्टोअर १८ एप्रिल रोजी मुंबईत सुरु झाले आहे. याचे उद्घाटन सीईओ टीम कुक यांनी केले. मुंबईच्या अ‍ॅपल स्टोअरच्या भिंतींवर मुंबईच्या काळी -पिवळी टॅक्सी कलेतून प्रेरित पेंटिंग्ज साकारण्यात येणार आहेत. याशिवाय अ‍ॅपल बीकेसी क्रिएटिव्हमध्ये अ‍ॅपलची अनेक उत्पादने आणि सेवा कोरण्यात आल्या आहेत . स्टोअरचे क्रिएटिव्ह “हॅलो मुंबई” या क्लासिक अ‍ॅपल टॅगलाइनअंतर्गत तुमचे स्वागत करण्यात आले.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India second apple ceo tim cook retail store open in delhi saket tmb 01