scorecardresearch

Premium

Apple First Retail Store Opening: मुंबईत सुरू झालेल्या देशातील पहिल्या अ‍ॅपल स्टोअरबद्दल जाणून घ्या ‘या’ १० प्रमुख गोष्टी

Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात आले आहे.

Apple First Retail Store in mumbai
मुंबई Apple रिटेल स्टोअर (Image Credit-प्रदीप दास )

देशातील पहिले Apple रिटेल स्टोअर आज मुंबईत सुरु झाले आहे. याचे उद्घाटन सीईओ टीम कुक यांनी केले. मुंबईच्या अ‍ॅपल स्टोअरच्या भिंतींवर मुंबईच्या काळी -पिवळी टॅक्सी कलेतून प्रेरित पेंटिंग्ज साकारण्यात येणार आहेत. याशिवाय अ‍ॅपल बीकेसी क्रिएटिव्हमध्ये अ‍ॅपलची अनेक उत्पादने आणि सेवा देखील कोरल्या जातील. स्टोअरचे क्रिएटिव्ह “हॅलो मुंबई” या क्लासिक अ‍ॅपल टॅगलाइनअंतर्गत तुमचे स्वागत करण्यात येणार आहे.

Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात आले आहे. हे स्टोअर या मॉलमध्ये २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे केले आहे. मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या अ‍ॅपलच्या स्टोअरसारखेच असणार आहे. Apple चे भारतातील दुसरे फ्लॅगशिप स्टोअर राजधानी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे हे स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभरले जणार आहे. ही स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले जाणार आहे. या स्टोअरचे लॉन्चिंग २० एप्रिल रोजी होणार आहे.

sensex today
सर्वोच्च मूल्यांकन असलेल्या महत्त्वाच्या ७ भारतीय कंपन्यांचे बाजारमूल्य आता ‘इतके’ कोटी
sachin tendulkar share post on x about junabai tigress in Tadoba-Andhari Tiger Project
‘मास्टरब्लास्टर’ला पडली ‘जुनाबाई’ ची भुरळ, तिच्या तिन्ही पिढ्या पाहिल्याचा अभिमान
motocorp entered in electric scooter market in india
Money Mantra : हिरो मोटो कॉर्पची स्कूटर क्षेत्रात का मुसंडी?
job opportunities
नोकरीची संधी

हेही वाचा : गुगल, मायक्रोसॉफ्टचे टेन्शन वाढले! Elon Musk लॉन्च करणार ‘TruthGPT’; म्हणाले, “OpenAI आता…”

असे म्हटले जात आहे की Apple Store इतर सर्व स्मार्टफोन स्टोअरपेक्षा खूप वेगळे आहे. हे खास भारतीय संस्कृती लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये विविध राज्यांतील कलाकृती पाहता येईल. Apple च्या भारतातील पहिल्या रिटेल स्टोअरविषयी जाणून घेऊयात.

१.

Apple कंपनीला भारतात २५ वर्षे पूर्ण होत आहेत. आणि याच वर्षी कंपनीचे पहिले स्टोअर भारतात सुरु झाले आहे. २५ व्य वर्षी बीकेसी मध्ये रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये हे स्टोअर सुरु करण्यात आले आहे. तर भारतातातील दुसरे स्टोअर दिल्ली येथे २० एप्रिलपासून सुरु होणार आहे.

२.

Apple चे हे नवीन आऊटलेट हे त्याचे भारतीयकारण करण्यासाठीचे कंपनी प्रयत्न दिसून येत आहेत. मुंबईत सुरु झालेले आऊटलेट हे काळ्या आणि पिवळ्या रंगात करण्यात आले आहे. ज्याचा संबंध मुंबईच्या प्रसिद्ध टॅक्सीशी जोडलेला आहे.

३.

स्टोअरच्या छतामध्ये १,००० टाईल्स लावण्यात आल्या आहेत. प्रत्येक टाईल्स ही लाकडाच्या ४०८ तुकड्यांपासून तयार करण्यात आली आहे. ज्यमुळे ३१ मोड्यूल बनतात. हे इतके आकर्षक आहे की, ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच स्टोअरमधील पायऱ्या स्टेनलेस स्टीलच्या असून त्याचे माप १४ मित्र इतके आहे.

हेही वाचा : VIDEO: देशातील पहिले Apple चे रिटेल स्टोअर मुंबईत झाले सुरु, CEO टीम कुक यांनी केले ग्राहकांचे स्वागत

४.

Apple Bkc ने स्टोअरसाठी सोलर अ‍ॅरेचा वापर केला आहे. ज्यामध्ये जीवाष्म इंधन म्हणजे पेट्रोल-डिझेल अजिबात वापरले जाणार नाही आहे. म्हणजेच स्टोअर पूर्णपणे कारबन न्यूट्रल स्वरूपाचे आहे.

५.

या Apple स्टोअरमध्ये दोन दगडी भिंतीही आहेत. ज्यांचे दगड खास राजस्थानवरून आणले आहेत. हे संपूर्ण स्टोअर २०,००० चौरस फुटांमध्ये पसरलेले आहे. ज्यासाठी कंपनी १५ टक्के वार्षिक वाढीसह ४२ लाख रुपये प्रति महिना भरणार आहे.

६.

Apple Bkc या स्टोअरमध्ये १०० सदस्यांची एक टीम असणार आहे. जे १८ भारतीय भाषा बोलू शकतात. ज्यामुळे वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलणाऱ्या ग्राहकांशी लगेच कनेक्ट होता येईल.

७.

Apple बीकेसी स्टोअरमध्ये भारतीय ग्राहक कंपनीच्या AI सेवा ‘Apple Genius’ शी संवाद साधता येणार आहे. ही सुविधा परदेशात Apple स्टोअरमध्ये ऑफर केलेल्या सुविधांसारखीच आहे. Apple च्या जिनियसमधून ग्राहकांना कंपनीच्या कोणत्याही उत्पादनाची माहिती मिळणार आहे.

हेही वाचा : Apple चे CEO टीम कुक आज करणार भारतातील पहिल्या रिटेल स्टोअरचे उद्घाटन; ‘Hello Mumbai’ टॅगलाइनअंतर्गत होणार जंगी स्वागत

८.

Apple बीकेसी मध्ये ग्राहक नवीन आयफोन्स आणि कंपनीची बाकी प्रॉडक्ट्स खरेदी करू शकतात. तसेच खरेदीदार त्यांचे जुने आयफोन, मॅक, आयपॅड असे नवीन प्रॉडक्ट्स खरेदी करण्यासाठी एक्सचेंज ऑफर मिळणार आहे.

९.

Apple च्या म्हणण्यानुसार, हे स्टोअर भारतात रोजगाराला देखील चालना देणार आहे. सध्या Apple भारतामध्ये २,५०० लोकांना रोजगार देत आहे. आता त्यांच्या App इकोसिस्टमद्वारे १० लाख नोकऱ्या निर्माण करण्यास मदत करणार आहे.

१०.

हे स्टोअर व्यावसायिक, निर्माते किंवा Apple कर्मचार्‍यांनी होस्ट केलेले “Today at Apple” देखील होस्ट करेल. या सत्रात महत्वाची गोष्ट ही आहे की,यामध्ये कलाकार, छायाचित्रकार आणि इतर सर्जनशील व्यावसायिकांच्या कार्यशाळा समाविष्ट केल्या जाणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Top 10 things know about india apple first retail store ceo tim cook in mumbai bkc jio drive mall tmb 01

First published on: 18-04-2023 at 15:19 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×