सोशल मीडियाच्या क्षेत्रातील मातब्बर अशा मेटा कंपनीच्या इन्स्टाग्रामने स्वतःचे थ्रेड हे मायक्रोब्लॉगिंग ॲप लॉन्च केले आहे. ट्विटरच्या इतर स्पर्धकांपेक्षा थ्रेड वेगळे आहे. थ्रेड्स ॲप हे इन्स्टाग्रामचेच दुसरे रूप आहे. फक्त यावर फोटो आणि व्हिडिओ कटेंटऐवजी मजकूर व संवादावर आधारित कटेंटला अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. इन्स्टाग्राम अकाउंटच्या लॉगिन डिटेल्स वापरून थ्रेड्सवर अकाउंट बनवणे शक्य होणार आहे.  हे अ‍ॅप ट्विटरला टक्कर देणार आहे. एलॉन मस्क यांच्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी हे अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे. हे App वापरकर्त्यांना फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर फॉलो करत असलेल्या अकाउंट्सना परवानगी देईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये मेटा अधिक लोकप्रिय होत आहे. इन्स्टाग्राम आधारित थ्रेड्स लॉन्च झाल्यापासून तर याची लोकप्रियता अधिक वाढत आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये हे App १० कोटी लोकांनी वापरण्यास सुरूवात केली आहे. मार्क झुकरबर्ग यांचे हे App ट्विटरला टक्कर देत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अजूनही ट्विटरवर जी फीचर्स उपलब्ध आहेत ती थ्रेड्सवर देण्यात आलेली नाहीत. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : मेटाने ‘Threads’ अ‍ॅप लॉन्च केल्यामुळे Twitter चं टेन्शन वाढणार; जाणून घ्या कसे डाउनलोड करायचे?

Threads अ‍ॅपची फीचर्स

इन्स्टाग्राम आधारित थ्रेड्स अ‍ॅपची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. सध्या हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. थ्रेडस डेस्कटॉपवर काम करत नाही. ज्या प्रमाणात याची लोकप्रियता वाढताना दिसत आहे,त्यानुसार या अ‍ॅपमध्ये नवीन फीचर्स लवकरच येतील अशी अपेक्षा आहे. थ्रेडसची मांडणी देखील ट्विटरशी मिळतीजुळती आहे.

Threads ट्विटरपेक्षा आहे वेगळे

१. ट्विटरवर ट्रेडिंग टॉपिकसाठी हॅशटॅग फिचर आहे. थ्रेड्सवर ही मिळत नाही.

२. वापरकर्त्यांना ट्विटर हे मोबाइल आणि डेस्कटॉपवर वापरता येते. तर थ्रेड्स केवळ अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

३. ट्विटरवर वापरकर्त्यांना थेट मेसेज करता येतो. तथापि थ्रेड्सवर हे फिचर उपलब्ध नाही.

४. ट्विटरने नुकतेच आपल्या प्रीमियम वापरकर्त्यांसाठी ट्विट एडिट करण्याचा पर्याय दिला आहे. मेटा थ्रेड्समध्ये एकदा तुमची पोस्ट प्रकाशित झाली एडिट करण्याची परवानगी मिळत नाही. थ्रेड्स App वर ती पोस्ट डिलीट करावी लागेल किंवा नवीन पोस्ट तयार करावी लागेल. फेसबुक व इन्स्टाग्रामवर हे उपलब्ध असल्याने काही दिवसांतच ते थ्रेड्सला मिळू शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instagram meta threads app download 10 crores users in 5 days competition with twitter tmb 01