Jio Launch new plan: Reliance Jio नं आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन डेटा पॅक लाँच केला आहे. या पॅकचा उद्देश्य ग्राहकांसाठी फक्त अतिरिक्त डेटा देत नाही तर त्याचबरोबर JioHotstar चे फ्री सब्सक्रिप्शन देखील देतो.Reliance Jio ने भारतातील क्रिकेट रसिकांना उद्देशून एक नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केली आहे. या सब्सक्रिप्शन सह युजर्स क्रिकेटच्या सीजन मधील सर्व सामने कोणत्याची अतिरिक्त शुल्काविना फक्त रिचार्ज करून पाहू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्लॅनमध्ये JioHotstar, JioCinema आणि Disney+ Hotstar या प्लॅटफॉर्मवर मोफत प्रवेश समावेश आहे. यामध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट आणि इतर विविध क्रीडा स्पर्धांसह चालू स्पर्धेतील सामने थेट पाहता येणार आहेत. Jio च्या या रिचार्ज प्लॅनची किंमत १९५ रुपये आहे. बेनेफिट्स पाहता, जिओच्या या नवीन डेटा पॅकमध्ये युजर्सना १५GB डेटाची सुविधा मिळेल. डेटा कोटा संपल्यावर इंटरनेट स्पीड कमी होऊन ६४ Kbps होतो. हा प्लॅन युजर्सना लाइव्ह क्रिकेट मॅच बघण्यासाठी JioHotstar Mobile सब्सक्रिप्शन देखील देत आहे. हे सब्सक्रिप्शन एकूण ९० दिवस उपलब्ध होईल. या पॅकसह युजर्स क्रिकेटच्या सीजन मध्ये सर्व सामने ऑनलाइन पाहता येतील तेही अगदी मोफत.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हा प्लॅन अॅक्टिव्ह करण्यासाठी अॅक्टिव्ह रिलायन्स जिओ प्रीपेड बेस प्लॅन आवश्यक आहे. बेस प्लॅनशिवाय, फायदे लागू होणार नाहीत. तो प्लॅन व्हॅलिडिटी, डेटा व कॉलिंग बेनेफिट्स सह येणार असावा. बेस प्लॅन शिवाय या नवीन डेटा प्लॅनचा वापर ग्राहकांना करता येणार नाही.

Airtel च्या ग्राहकांसाठी खुशखबर

एअरटेल (Airtel) सर्व प्रकारच्या (प्रीपेड आणि पोस्पेड) युजर्ससाठी रिचार्ज प्लान लाँच करत असते. अगदी एअरटेलचा वाय-फाय प्लॅन, एअरटेलचा प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅन आदी अनेक रिचार्ज प्लॅन उपल्बध आहेत. पण, आता कंपनी ग्राहकांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. अ‍ॅपल टीव्ही प्‍लस आणि अ‍ॅपल म्युजिक (Apple TV+ and Apple Music) चा लाभ ग्राहकांना घेता यावा यासाठी भारती एअरटेल आणि ॲपल यांनी पार्टनरशिप केली आहे. सर्व एअरटेल वायफाय ग्राहकांना ९९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या होम वाय-फाय प्लॅन्सवर अ‍ॅपल टीव्ही प्‍लसच्या कंटेंटमध्ये मोफत प्रवेश मिळेल. त्याचबरोबर प्रवास करताना एकाधिक डिव्हाइसेसवर तुम्ही हा कन्टेन्ट पाहू शकणार आहत. याव्यतिरिक्त, पोस्टपेड ग्राहक ९९९ रुपये पासून सुरू होणाऱ्या प्लॅनवर अ‍ॅपल टीव्ही प्‍लस आणि अ‍ॅपल म्युजिकमध्ये सहा महिन्यांसाठी प्रवेश मिळेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio launches rs 195 prepaid plan with free jio hotstar access for cricket fans all benefits srk