man duped for 1.22 lack while trying to renew Netflix subscription | Loksatta

CYBER FRAUD : नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रिन्यू करण्याच्या नावावर लूट, व्यापाराला १.२२ लाखांचा गंडा

नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रिन्यू करण्याच्या नावावर सायबर चोरट्यांनी ७४ वर्षीय व्यापाऱ्याकडून १.२२ लाख रुपये लुटले आहेत.

CYBER FRAUD : नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रिन्यू करण्याच्या नावावर लूट, व्यापाराला १.२२ लाखांचा गंडा
(pic credit – Pixabay)

देशात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ अभिनेते अनू कपूर यांची फसवणूक केली होती. मात्र त्यांनी वेळीच पोलिसांना माहिती दिल्याने त्यांचे अधिक नुकसान टळले. आता पुन्हा एक ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मुंबईतील जुहू भागातील आहे. नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रिन्यू करण्याच्या नावावर सायबर चोरट्यांनी ७४ वर्षीय व्यापाऱ्याकडून १.२२ लाख रुपये लुटले आहेत.

काय आहे प्रकार?

व्यावसायिकाने फसवणुकीच्या हेतूने पाठवण्यात आलेल्या इमेलला प्रतिक्रिया देताना आपल्या बँक खात्याची माहिती शेअर केली आणि नंतर १ लाख रुपये गमवले. ४९९ रुपये दिले नाही म्हणून सब्सक्रिप्शन थांबवून ठेवल्याचे या ईमेलमध्ये सांगण्यात आले होते. हे सब्सक्रिप्शन सुरू करण्यासाठी व्यापाऱ्याने आपल्या बँक खात्याची माहिती दिली आणि पैसे गमवून बसला.

(APPLE IPHONE : अलास्कामध्ये अडकला होता व्यक्ती, अ‍ॅपल आयफोनने असे वाचवले प्राण)

या प्रकरणी व्यावसायिकाने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी २९ नोव्हेंबरला या प्रकरणी गुन्हा नोंदवला. पोलिसांनुसार, नेटफ्लिक्सकडून ग्राहकांना पाठवण्यात येत असलेले ईमेल आणि आलेला इमेला यामध्ये साम्य असल्याचे तक्रारकर्त्याला वाटले.

फसवुकीसाठी पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये ४९९ रुपयांचे पेमेंट करण्यासाठी लिंक देखील देण्यात आली होती. याबाबत विचार न करता तक्रारकर्त्याने लिंकवर क्लिक केले आणि आपल्या क्रेडिट कार्डविषयी माहिती जमा केली. १.२२ लाख रुपयांच्या पेमेंटसाठी मोबाईलवर ओटीपी जनरेट झाला. मात्र, ज्या रकमेसाठी तक्रारकर्ता ओटीपी शेअर करणार होता, त्या रकमेकडे लक्ष न देताच त्याने ओटीपी शेअर केला. नंतर त्याच्या खात्यातून पैसे कमी झाले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

(आनंदाची बातमी! ‘REDMI NOTE 11’च्या किंमतीमध्ये मोठी कपात, ५० एमपी कॅमेरा आणि ‘FAST CHARGING’सह उपलब्ध)

तक्रारकर्त्याला नंतर बँककडून ऑटोमेटेड कॉल आला. त्यात तुम्ही १.२२ लाख रुपयांचा व्यवहार केला नसेल तर ८ क्रमांक दाबा, असे विचारण्यात आले. तेव्हा तक्रारकर्त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 11:00 IST
Next Story
आनंदाची बातमी! ‘REDMI NOTE 11’च्या किंमतीमध्ये मोठी कपात, ५० एमपी कॅमेरा आणि ‘FAST CHARGING’सह उपलब्ध