अ‍ॅपलच्या उपकरणांनी काही लोकांची संकटातून सुटका केल्याचे काही अहवालांतून समोर आले होते. आता पुन्हा असाच प्रकार समोर आला आहे. अ‍ॅपलच्या इमरजेन्सी एसओएस फीचरमुळे अलास्काच्या बर्फाच्छदित पर्वतांमध्ये अडकलेल्या माणसाचे प्राण वाचल्याचे समोर आले आहे.

केवळ अ‍ॅपल १४ आणि अ‍ॅपल १४ प्रो या मॉडेल्समध्येच हे एसओएस फीचर आहे. वायफाय किंवा सेल्युलर नेटवर्क नसताना हे फीचर वापरकर्त्यांना सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीद्वारे आपात्कालीन सेवांशी संपर्क साधू देते. संकटात सापडलेल्या व्यक्तीला या फीचरची मोठी मदत झाली आहे.

(व्हॉट्सअ‍ॅपमधून महत्वाचा फोटो, व्हिडिओ डिलीट झाला? असे परत मिळवा)

मॅकरुमर्सनुसार, स्नो मशीनद्वारे नूरविक ते कोटझेब्यू पर्यंत स्नो मशीनने प्रवास करत असलेला व्यक्ती संकटात सापडल्याचा अलर्ट अलास्का स्टेट ट्रूपर्सना मिळाला होता. हा व्यक्ती इंटरनेट नसलेल्या थंड आणि दुर्गम ठिकाणी अडकला होता. त्याला कॉलही करता येत नव्हते. या माणसाने नंतर फोनमधील आपात्कालीन एसओएस व्हाया सेटेलाईट फीचर वापरले. अलर्ट मिळाल्यानंतर बचाव पथक अ‍ॅपलने शेअर केलेल्या लोकेशनवर पोहोचले आणि व्यक्तीला वाचवण्यात आले.

अ‍ॅपलनुसार, सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी 62 अंश अक्षांशापेक्षा उंच ठिकाणी कदाचित प्रभावीपणे कार्य करू शकत नाही, ज्यामध्ये कॅनडा आणि अलास्काच्या उत्तर भागाचाही समावेश आहे.

मात्र, माणूस ज्या ठिकाण अडकला होता, ते दुर्गम स्थळ होते आणि ते सीमेवर आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे अशा ठिकाणाच्या जवळपास होते. नूरविक आणि कोटझेब्यू हे 69 अंश अक्षांशाच्या जवळ आहेत.

(अ‍ॅपलच्या ‘या’ उपकरणांपासून दूरच राहा, खरेदी केल्यास होईल नुकसान)

अ‍ॅपल ब्लॉगनुसार, सॅटेलाइट कनेक्शनचा वापर करतानाचा अनुभव हा सेल्युलर नेटवर्कवर असताना मेसेज पाठवणे किंवा येणे यापेक्षा वेगळा असतो. आकाश आणि क्षितिजाचे थेट दृश्य दिसत असलेल्या परिस्थितीत मेसेज पाठवण्यास १५ सेकंद लागू शकतात. आणि हलक्या किंवा मध्यम पर्णभार असलेल्या झाडांखालून मेसेज पाठवण्यासाठी एक मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही जड पर्णसंभाराखाली असाल किंवा इतर अडथळ्यांनी वेढलेले असाल, तर तुम्ही उपग्रहाशी कनेक्ट होऊ शकणार नाही. तुमच्या सभोवतालचा परिसर, तुमच्या संदेशाची लांबी आणि सॅटेलाइट नेटवर्कची स्थिती आणि उपलब्धता यामुळेही कनेक्शन प्रभावित होऊ शकते, असे अ‍ॅपल ब्लॉगचे म्हणणे आहे.