scorecardresearch

आनंदाची बातमी! ‘REDMI NOTE 11’च्या किंमतीमध्ये मोठी कपात, ५० एमपी कॅमेरा आणि ‘FAST CHARGING’सह उपलब्ध

तुम्ही नवा फोन घेण्याचा विचार करत असाल तर रेडमी नोट ११ हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

आनंदाची बातमी! ‘REDMI NOTE 11’च्या किंमतीमध्ये मोठी कपात, ५० एमपी कॅमेरा आणि ‘FAST CHARGING’सह उपलब्ध
(pic credit – mi.com)

Price cut on redmi note 11 mobile : लोकप्रिय मोबाईल निर्मिती कंपनी रेडमीने भारतात Redmi Note 11 स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. या फोनचे तीन व्हेरिएंट्स आहेत आणि तिन्ही व्हेरिएंट्सच्या किंमतीमध्ये ५००० रुपयांची कपात करण्यात आली आहे. तुम्ही नवा फोन घेण्याचा विचार करत असाल तर रेडमी नोट ११ हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

आता इतक्या किंमतीमध्ये उपलब्ध

रेडमी नोट ११ ४ जीबी आणि ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत १७ हजार ९९९ रुपयांवरून घटून १२ हजार ९९९ रुपयांवर आली आहे. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज व्हेरिएंटची किंमत कपाती नंतर १३ हजार ४९९ झाली आहे. तर, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज व्हेरिएंट १४ हजार ४९९ रुपयांमध्ये मिळत आहे.

(‘VI’ने लाँच केला नवीन वार्षिक प्लान, अमर्यादित कॉलिंगसह मिळणार ८५० जीबी BULK DATA, जाणून घ्या इतर लाभ)

वर नमूद केलेल्या सर्व किंमती अमेझॉन आणि कंपनीच्या अधिृत संकेतस्थळांवरही आहे. फ्लिपकार्टने तर बेस मॉडेलच्या किंमतीमध्ये आणखी सूट दिली असून फोन १२ हजार ७९९ रुपयांमध्ये उपलब्ध केला आहे. एमआयचे अधिकृत संकेतस्थळ देखील आयसीआयसीआय क्रेडिट कार्डवर १ हजार रुपयांची सूट देत आहे. यामुळे फोन ११ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळू शकतो.

फीचर्स

रेडमी नोट ११ हा ४ जी स्मार्टफोन आहे आणि त्यात अडथळ्याशिवाय कार्य होण्यासाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसर देण्यात आले आहे. दैनंदिन वापरासाठी हा फोन चांगला आहे. फोन अँड्रॉइड ११ सोबत लाँच झाला होता, त्यामुळे जे लोक आता हा फोन खरेदी करणार त्यांना नवीन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचा अनुभव घेता येणार नाही.

(APPLE IPHONE : अलास्कामध्ये अडकला होता व्यक्ती, अ‍ॅपल आयफोनने असे वाचवले प्राण)

फोनमध्ये ६.४३ इंच फूल एचडी प्लस डिस्प्ले, ५० मेगापिक्सेल क्वाड रिअर कॅमेरा सेटप, सेल्फीसाठी १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि ३३ वॉट फास्ट चार्जिंगसह ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनला आयपी ५३ रेटिंग मिळाली असून फोन फ्लॅश रेझिस्टेंट आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 09:59 IST

संबंधित बातम्या