ट्विटरवर व्हिडीओ संदर्भात एक नवे फीचर लाँच झाले आहे. या फीचरमध्ये टिकटॉकवर वापरण्यात आलेल्या व्हिडीओ स्क्रोलिंगप्रमाणे व्हिडीओ पाहता येणार आहेत. इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर हे फीचर याआधीच उपलब्ध झाले आहे. या फीचरच्या माध्यमातून ट्विटर इतर प्लॅटफॉर्मबरोबर ट्रेंडमध्ये येण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. सध्या ट्विटरच्या लेटेस्ट वर्जनवर या फीचरचे परीक्षण सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. कसे वापरायचे हे फीचर जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवे फीचर वापरण्याची पद्धत

  • या फीचरमुळे युजर्सना एक पर्याय निवडून ‘फुल स्क्रीन मोड’वर व्हिडीओ पाहता येणार आहे.
  • यसाठी ट्विटर ॲप उघडून सर्वात शेवटी असणाऱ्या सर्च पर्यायावर क्लिक करा.
  • त्यामध्ये सर्वात शेवटी व्हिडीओ फॉर यु (Video For You) हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. अशाप्रकारे तुम्ही टिकटॉकप्रमाणे ट्विटरवर व्हिडीओ पाहू शकता.
  • यामध्ये तुम्हाला ‘फुल स्क्रीन इमरसिव मोड’वर व्हिडीओ पाहता येतील. तसेच एकापाठोपाठ एक व्हिडीओ ब्राउज करता येतील.
  • यामध्ये तुम्ही फॉलो करत असलेल्या, तसेच फॉलो करत नसलेल्या व्यक्तींचे व्हिडीओसुद्धा दिसतील. प्रामुख्याने तुम्ही जो कंटेंट पाहता त्याप्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील.
  • सध्या हे फीचर फक्त अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे. लवकरच आयओएस वर्जनमध्ये लाँच केले जाईल.

आणखी वाचा : GPay Payment : गूगलच्या प्रत्येक पेमेंटमधून जास्त कॅशबॅक मिळवण्यासाठी वापरा ‘ही’ ट्रिक

सध्या हे फीचर फक्त काही ठिकाणी उपलब्ध आहे जिथे ट्विटर इंग्रजीमधून वापरले जाते. व्हिडीओ सेक्शनमध्ये युजर्सना आवडतील असे ट्रेंड्सचे ट्वीट्सचे सजेशन देण्यात येइल. तसेच प्रत्येक व्हिडीओचे व्ह्यूजदेखील दाखवण्यात येतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New video scrolling feature is available on twitter which looks like tiktok know more pns
First published on: 03-10-2022 at 12:25 IST