Premium

ऑनलाइन फसवणूक झाली आहे? ‘हे’ सोपे काम करून तात्काळ परत मिळवता येणार पैसे

जर दुर्दैवाने तुम्ही देखील ऑनलाइन फसवणूकीला बळी पडला असाल तर हे सोपे काम करून तुम्ही तुमचे सर्व पैसे परत मिळवू शकता.

online fraud
ऑनलाइन फसवणूक झाली आहे? 'हे' सोपे काम करून तात्काळ परत मिळवता येणार पैसे (Photo : Pexels)

इंटरनेटमुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे. परंतु सोबतच अनेक समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे ऑनलाइन फसवणूक. इंटरनेटवर होणाऱ्या फसवणूकीच्या घटनांबाबत सर्वांनाच माहित आहे. परंतु तरी देखील फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जर दुर्दैवाने तुम्ही देखील ऑनलाइन फसवणूकीला बळी पडला असाल तर हे सोपे काम करून तुम्ही तुमचे सर्व पैसे परत मिळवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑनलाइन फसवणूकीला कोणीही बळी पडू शकतो. जर तुमच्यासोबतही ऑनलाइन फसवणूक झाली असेल, तर एक उपाय आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता आणि तुमचे पैसे परत मिळवू शकता. ऑनलाइन फसवणूकसाठी तक्रार क्रमांक म्हणजेच हेल्पलाइन नंबर ‘१९३०’ आहे. या नंबरवर कॉल करून तुम्हाला तात्काळ मदत मिळेल.

तुम्ही तुमचा UPI ID विसरलात? चिंता नाही; Paytm, PhonePe आणि Google Pay वरून सहज शोधात येणार

ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समजताच, सर्वप्रथम ऑनलाइन फ्रॉड हेल्पलाइन नंबर ‘१९३०’ ला संपर्क करा. तुम्ही या नंबरवर ताबडतोब तक्रार नोंदवू शकता, त्यानंतर फायनॅन्शियल इंटरमिडीअरी कन्सर्नवर एक तिकीट तयार केले जाईल. अशा प्रकारे, ज्या खात्यातून पैसे काढले गेले आहेत आणि ज्या खात्यात पैसे जमा केले गेले आहेत त्या दोन्हीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. याच्या मदतीने ऑनलाइन फसवणुकीत गमावलेले पैसे परत मिळू शकतात.

आता अ‍ॅप न उघडताच होणार पेमेंट; जाणून घ्या Google Pay चे नवे फीचर

ऑनलाइन फसवणुकीत गमावलेले पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला वेळीच योग्य पावले उचलावी लागतील. ऑनलाइन फसवणुकीची तक्रार जितक्या लवकर दाखल होईल तितक्या लवकर आरोपींना पकडणे सोपे होईल. तुम्ही वेळीच तक्रार केल्यास, सखोल चौकशीनंतर तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे परत मिळू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Online fraud money can be recovered immediately by doing this simple thing pvp

First published on: 14-05-2022 at 15:48 IST
Next Story
तुम्ही तुमचा UPI ID विसरलात? चिंता नाही; Paytm, PhonePe आणि Google Pay वरून सहज शोधात येणार