गुगल पेने पाईन लॅबच्या सहकार्याने एक फीचर जारी केले आहे जे युपीआयसाठी टॅप टू पे पद्धत वापरण्यास अनुमती देईल. आतापर्यंत, टॅप टू पे फिचर फक्त कार्डसाठी उपलब्ध होते. सध्याच्या काळात ऑनलाइन पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे. पण यापुढे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी अ‍ॅप उघडण्याची गरज नाही. कोणत्याही मशिनने फोनला फक्त टच केल्याने काही सेकंदात पेमेंट केले जाईल. असेच एक फिचर गुगल पेने पाईन लॅबच्या सहकार्याने सादर केले आहे.

ही सुविधा रिलायन्स रिटेलसह सुरू करण्यात आली आहे आणि आता ती फ्युचर रिटेल, स्टारबक्स आणि इतर व्यापाऱ्यांकडे उपलब्ध असेल. वापरकर्त्यांना नवीन फीचर चांगल्या प्रकारे समजून येण्यासाठी गुगलने एक हेल्प पेज देखील लॉंच केले आहे. जर तुम्हाला युपीआय पेमेंटसाठी टॅप टू पे फीचर वापरायचे असेल तर तुमच्या अ‍ॅड्रॉइड स्मार्टफोनमध्ये एनएफसी सुविधा आहे का ते तपासा. ते तपासण्यासाठी, तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छोटे बदल मोठा आर्थिक फायदा; लाइट बील कमी करण्यासाठी ‘या’ खास Tips तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील

  • सर्व प्रथम, अ‍ॅड्रॉइड फोनवर सेटिंग्ज उघडा.
  • बहुतेक अ‍ॅड्रॉइड फोनमध्ये कनेक्शन सेटिंग्जमध्ये एनएफसी फिचर असते. हे फीचर उपलब्ध असल्यास एनएफसी आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट पर्यायावर क्लिक करा.
  • ते एनएफसी असल्यास, ते शोध परिणामांमध्ये दिसेल. तुम्ही तिथून फीचर अ‍ॅक्टिव्ह करू शकता.

गुगल पेने पैसे कसे पाठवावे?

  • सर्व प्रथम फोन अनलॉक करा. त्यानंतर पेमेंट टर्मिनलवर फोन टॅप करा
  • गुगल पे आपोआप उघडेल.
  • देयक रकमेची पुष्टी करा आणि पुढे जा वर टॅप करा.
  • पैसे हस्तांतरित झाल्याची माहिती दिसेल.