OpenAI ने OpenAI o1 आणि OpenAI o1 Mini नावाचे नवीन एआय मॉडेल लाँच केले आहेत. गुरुवारी १२ सप्टेंबर रोजी कंपनीकडून एक्स या समाज माध्यामावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. हे मॉडेल विज्ञान, कोडिंग, रिझनिंग आणि गणितातील अवघड प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असून मागील मॉडेल्सपेक्षा हे मॉडेल सरस असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हे मॉडेल्स स्पर्धा परीक्षांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त ठरेन, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

कंपनीने नेमकं काय म्हटलं आहे?

आम्ही OpenAI o1 आणि OpenAI o1 Mini या हे नवीन एआय मॉडेल लॉंच केले आहेत. अवघड प्रश्नांची उत्तर देण्यासाठी या दोन्ही मॉडेल्सला आम्ही प्रशिक्षीत करत आहोत. हे एआय मॉडेल्स उत्तर देण्यापूर्वी माणसांप्रमाणे अधिक विचार करेन तसेच स्वत:च्या चुका ओळखून त्यावर काम करेन, अशी माहिती OpenAI कडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – Android युजर्ससाठी धोक्याची घंटा! वैयक्तिक माहिती, गूगल पे, डेटाचे होईल नुकसान; फक्त ‘हा‘ एकच उपाय…

या एआय मॉडेल्सची वैशिष्ट्ये काय?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही एआय मॉडेल्स मानवासारखा विचार करू शकतात. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय गणित, रिझनिंग, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातील कठीण प्रश्नांची उत्तर देण्यासाठीही O1 मॉडेल सक्षम आहे. महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडच्या पात्रता परीक्षेत O1 मॉडेलने GPT-4o पेक्षा८३ टक्के चांगली कामगिरी केल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – Aadhaar Card Update : १४ सप्टेंबरपर्यंत आधारकार्ड अपडेट करा नाहीतर भरावा लागेल इतका दंड; जाणून घ्या ,आधार कार्ड ऑनलाईन कसे अपडेट करावे?

OpenAI o1 आणि OpenAI o1 Mini हे मॉडेल्स विशेषतः विज्ञान, कोडिंग आणि गणितातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त आहेत. पेशी अनुक्रमण डेटावर भाष्य करणे, क्वांटम ऑप्टिक्ससाठी गुंतागुंतीचे फॉर्म्युले तयार करणे आणि मल्टी-स्टेप वर्कफ्लो बनवण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.