Samsung अफॉर्डेबल फ्लॅगशिप फोन Galaxy S21 FE 5G बाजारात आला, काय आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन, जाणून घ्या

सॅमसंगने आपला अफॉर्डेबल फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S21 FE 5G भारतासह जगभरात सादर केला आहे. याची अनेक दिवसांपासून ग्राहकांना प्रतीक्षा होती. जाणून घ्या किंमत आणि फिचर्स…

samsung-Galaxy-S21-FE5G
(Photo- Samsung Mobile TZ /Twitter)

दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने आपला अफॉर्डेबल फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S21 FE 5G भारतासह जगभरात सादर केला आहे. याची अनेक दिवसांपासून ग्राहकांना प्रतीक्षा होती. कंपनीने त्याची विक्रीही जाहीर केली आहे. या फोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, जे लोकांना आकर्षित करतात. तुम्ही आता सॅमसंगच्या पोर्टलवरून ऑनलाइन ऑर्डर करू शकता. या स्मार्टफोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले आणि Android 12 देण्यात आला आहे.

अलीकडेच सॅमसंग इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या वर्षातील त्यांच्या पहिल्या फ्लॅगशिप प्रोडक्टबद्दल ट्विट केलं आहे. सॅमसंग गॅलेक्सी S21 FE 5G बद्दल ट्विटमध्ये माहिती देताना कंपनीने सांगितले आहे की, हा एक उत्तम प्रोसेसर तसंच चांगला कॅमेरे देखील देतो. प्रत्येक दिवस ग्राहकांसाठी खास बनवण्यासाठी हा फोन अधिक चांगला असू शकतो, असे कंपनीने म्हटले आहे.

आणखी वाचा : तुमच्या फोनमध्ये हे Privacy-Protection Tools आहेत? कसा करायचा वापर आणि सुरक्षितता कशी मिळवायची? जाणून घ्या

Samsung Galaxy S21 FE स्‍पेसिफिकेशन
हा एक 5G फोन आहे जो किफायतशीर फ्लॅगशिप ऑफर करतो. हे आकर्षक डिझाइन, मजबूत कामगिरी, प्रो-ग्रेड कॅमेरासह येते. Galaxy S21 FE 5G मध्ये ६.४ इंच FHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले सुपर-स्मूथ १२० Hz रिफ्रेश रेट, ड्युअल रेकॉर्डिंगसह प्रो-ग्रेड कॅमेरा सेटअप, २४० Hz टच सॅम्पलिंग रेट आणि ५ nm Exynos २१०० प्रोसेसर आहे. याशिवाय यात ४५०० mAh बॅटरी देण्यात आली आहे. दुसरीकडे, जर आपण या फोनच्या रंगाबद्दल बोलायचं झालं तर हा फोन ऑलिव्ह, लॅव्हेंडर, व्हाईट आणि ग्रेफाइट सारख्या रंगांमध्ये येतो. तुम्हाला हवं असल्यास हा स्मार्टफोन Samsung.com, amazon.in आणि निवडक रिटेल स्टोअर्सवरून खरेदी करता येईल.

आणखी वाचा : Oppo दाखवणार ब्रॅंड पॉवर, दोन धमाकेदार बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स लवकरच भेटीला, जाणून घ्या खास फीचर्स आणि किंमत

Samsung Galaxy S21 FE 5G किंमत
Galaxy S21 FE 5G दोन प्रकारांमध्ये सादर केला जात आहे. Galaxy S21 FE 5G च्या 8GB + 128GB व्हेरिएंटसाठी ४९,९९९. तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत ५३,९९९ रुपये देण्यात आली आहे. त्याच वेळी, तुम्ही HDFC बँकेचे कार्ड वापरून या फोनवर सूट मिळवू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Phone gadget affordable flagship phone samsung galaxy s21 fe 5g launch know price and specification prp

Next Story
तुमच्या फोनमध्ये हे Privacy-Protection Tools आहेत? कसा करायचा वापर आणि सुरक्षितता कशी मिळवायची? जाणून घ्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी