तुम्‍ही तुमच्‍या मोबाईलमधल्या डेटाबद्दल चिंतेत आहात? मोबाइल अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स त्या डेटाचा कसा वापर करतात, याबद्दल काळजी वाटते? जर होय, तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील काही Privacy-Protection Tools च्या मदतीने ही भीती बऱ्याच प्रमाणात कमी करू शकता.

परंतु, हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे की, जेव्हा तुम्ही वेब ट्रॅकर्स आणि लोकेशन इन-फॉर्मेशनला ब्लॉक करता तेव्हा विनामूल्य अ‍ॅप्स वेगळ्या पद्धतीने काम करू लागतात. परंतु तुम्हाला तुमच्या माहिती/डेटावर अधिक नियंत्रण हवे असल्यास, तुम्ही या मार्गांनी मदत मिळवू शकता…

how to To Stay Cool in summer
Heatwave Precautions : उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण कसे करावे? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स….
World Art Day Art and Income Source in Marathi
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री…आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला मिळू शकते नवी दिशा
How To Made Homemade Crispy Potato Wafers
१ किलो बटाटे वापरून घरच्याघरी बनवा खमंग ‘बटाटा वेफर्स’; ३ वर्ष खराब होणार नाहीत
Eating Chavalichi Bhaji Can Cure Thyroid
चवळीच्या भाजीने थायरॉईड बरा होतो का? वजन कमी करताना चवळी किती फायद्याची, तज्ज्ञांची स्पष्ट माहिती, वाचा

लोकेशन : वाहन चालवताना दिशा देण्यासाठी तुमच्या फोनच्या लोकेशन सर्विसेस अतिशय महत्त्वाच्या आहेत. पण, iOS (Apple iPhone साठी ऑपरेटिंग सिस्टीम) आणि Android तुम्हाला अधिक गोपनीयतेच्या उद्देशाने तुम्हाला जे लोकेशन शेअर करायचे आहेत फक्त तेच लोकेशन शेअर करण्याची परवानगी देतं.

iOS 15 डिव्हाईसवर, प्रायव्हसी मेनूमधील ‘लोकेशन सर्व्हिसेस’ वर जा, इथे तुम्हाला “सिस्टम सर्व्हिसेस” वर टॅप करणे आवश्यक आहे. तुम्ही इथून लोकेशन सर्व्हिसेस इनेबल आणि डिसेबल करू शकता. तसेच थर्ड पार्टी अ‍ॅप्स (Google सॉफ्टवेअरसह) नियंत्रित करू शकतात. Android 12 असलेल्या स्मार्टफोन्सवर, तुम्ही ही गोष्ट सेटिंग्जमध्ये “लोकेशन” अंतर्गत शोधू शकता.

अ‍ॅप्स आणि जाहिराती: तर तुमच्या मोबाईलमधलं एखादं अ‍ॅप तुमच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हीटीला मॉनिटर करतं, त्यावेळी iOS 15 मधील अ‍ॅपल मधले अ‍ॅप ट्रॅकिंग ट्रान्सपरेन्सी फीचर तुम्हाला चेतावनी देतं याशिवाय, तुम्ही अ‍ॅपल अ‍ॅडव्हर्टायझींग एरियामध्ये जाऊन अ‍ॅड्स (जाहिराती) बंद करू शकता. त्याच वेळी, आपण अलीकडे जी अ‍ॅप्स वापरत नाही, Android त्या अ‍ॅप्सच्या परवानग्या आपोआप बंद करतं. पण तुम्ही ‘सेटिंग्ज’मध्ये जाऊन प्रायव्हसी ऑप्शनच्या माध्यमातून त्यात एक्सेस करू शकता.

वेब: सफारीचं प्रायव्हेट ब्राउझिंग आणि Google Chrome चं इनकॉग्निटो मोड तुमचं सर्फिंग सेशन स्टोअर करत नाहीत. परंतु हे ब्राउझर ट्रॅकर्ससाठी तितकेसे प्रभावी नाहीत. अ‍ॅपलचा सफारी ब्राउझर या प्रकारच्या ट्रॅकिंगला ब्लॉक करण्यासाठी एक टूल ऑफर करतो, जो सेटिंग्जमध्ये ‘सफारी’ वर गेल्यावर ‘प्रायव्हसी अ‍ॅण्ड सिक्यूरिटी’ मध्ये आढळतो.

मेल: जाहिरातदार काही संदेशांमध्ये TrackingPixel वापरू शकता. ही एक प्रकारची लहान प्रतिमा आहे, जी लपलेली असते. असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा युजर संदेश उघडतो तेव्हा तो संदेश पाठवणाऱ्याला कळवतो. म्हणजेच त्याला याबद्दल माहिती देतो. iOS 15 मध्ये या प्रकारच्या मेल ट्रॅकरला ब्लॉक करण्यासाठी एक टूल आहे, जे सेटिंग्जमध्ये जाऊन मेल विभागात इनेबल केले जाऊ शकते.

तुम्ही Android किंवा iOS वर Gmail अ‍ॅपमध्ये फोटो आपोआप लोड होण्यापासून थांबवू शकता. सेटिंग्ज वर जा आणि तुमच्या खात्याच्या नावावर टॅप करा. नंतर “इमेज” भागात, “आस्क बिफोर डिस्प्लेइंग एक्सटर्नल इमेजेस…” पर्याय निवडा.