iPhone13 वर ऑफर्सचा पाऊस! मिळतेय ३० हजार रुपयांची घवघवीत सूट | Rain of offers on iPhone13! Get a huge discount of 30 thousand rupees | Loksatta

iPhone13 वर ऑफर्सचा पाऊस! मिळतेय ३० हजार रुपयांची घवघवीत सूट

iPhone १४ लाँच होण्यापूर्वी iPhone 13 च्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया iPhone 13 वरील सूट आणि ऑफर्स…

iPhone13 वर ऑफर्सचा पाऊस! मिळतेय ३० हजार रुपयांची घवघवीत सूट
iPhone13 वर ऑफर्सचा पाऊस( फोटो: financial express)

iPhone 13 Price Cut: आयफोन १४ सप्टेंबर महिन्यात लाँच होणार आहे. पण त्याआधी आयफोन १३ वर फास्ट डिस्काउंट दिले जात आहेत. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून आयफोन १३ अतिशय स्वस्तात खरेदी करता येईल. जर तुम्ही नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल आणि बजेट थोडे कमी असेल तर हीच तुमच्यासाठी योग्य संधी आहे. आयफोन १४ लाँच होण्यापूर्वी आयफोन १३ च्या किमतीत मोठी कपात करण्यात आल्याने आयफोन प्रेमी खूश झाले आहेत. चला जाणून घेऊया आयफोन १३ वरील सूट आणि ऑफर्स…

iPhone 13 ऑफर आणि सवलत

आयफोन १३ (१२८जीबी) ची लॉन्चिंग किंमत ७९,९०० रुपये आहे परंतु सध्या मिळत असलेल्या ऑफरमुळे आयफोन १३ फ्लिपकार्टवर ७३,९०९ रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर ५९९१ रुपयांची सूट दिली जात आहे. त्यानंतर अनेक बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील आहेत, ज्यामुळे फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.

( हे ही वाचा: २८,००० रुपयांच्या सवलतीसह मिळतोय iPhone 12 5G; जाणून घ्या संपूर्ण ऑफर)

iPhone 13 बँक ऑफर

आयफोन १३ खरेदी करण्यासाठी तुम्ही HDFC डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला १ हजार रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत ६९,९०९ रुपये एवढी असेल. त्यानंतर एक्सचेंज ऑफर देखील आहे. यामुळे अजून आयफोन १३ च्या किंमतीत सूट मिळू शकते.

आयफोन 13 एक्सचेंज ऑफर

आयफोन १३ वर १९ हजार रुपयांची मोठी एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला खूप मोठी सूट मिळू शकते. परंतु जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तरच तुम्हाला १९ हजार रुपयांची सूट मिळेल. जर तुम्ही फुल ऑफ मिळू शकलात, तर फोनची किंमत ५०,९०९ रुपये असेल. म्हणजेच आयफोन १३ च्या लाँचिंग किंमतपेक्षा जवळपास ३०,००० रुपयांपर्यंत घवघवीत सूट मिळण्याची संधी उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आता आईच सांगेल मोबाईल वापर.. ‘या’ नव्या अभ्यासात समोर आलाय भन्नाट Result, जाणून घ्या

संबंधित बातम्या

विश्लेषण: ६ दिवसात १० लाख युजर्स, एलॉन मस्कने केलं कौतुक, गुगलपेक्षा अचूक उत्तर देणारं ChatGPT कसं करतं काम?
घाई कराल तर आकर्षक फोन्सना मुकाल, डिसेंबरमध्ये लाँच होणार ‘हे’ दमदार फोन; १०८ एमपी कॅमेरा आणि बरेच काही
YOUTUBE TOP 10 यादी जाहीर, 2022 मध्ये ‘या’ व्हिडिओजना सर्वाधिक पसंती, कोणी पटकवले पहिले स्थान? पाहा
अबब.. काही मिनिटांतच होणार फूल चार्ज! ‘या’ फोनमध्ये मिळू शकते २५० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट
सोशल मीडियावर बराचसा वेळ वाया जातोय का? ‘या’ टिप्स वापरून राहा त्यापासून दूर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“तुमची लायकी…”, JNU मधील ब्राह्मणविरोधी घोषणांवरून मनोज मुंतशिर-काँग्रेस नेत्यात बाचाबाची; सावरकरांचाही केला उल्लेख
उदय सामंत यांनी दिली जत तालुक्यातील गावांना भेट, स्थानिकांनी मांडल्या व्यथा!
सांगली: वाळवा तालुक्यात ऊसाच्या फडात आढळला जखमी रानगवा; उपचारानंतर नैसर्गिक आधिवासात सोडणार
Team India: राहुल द्रविडची प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी? बीसीसीआयकडून हालचालींना वेग
Himachal Pradesh Election Exit Poll : हिमाचलमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत; सत्ता परिवर्तनाची परंपरा कायम राहण्याची चिन्ह!