Realme 10 Pro series will launch in india on 8 december check price and features | Loksatta

REALME 10 PRO + फोनची किंमत पाहून रेडमीलाही फुटणार घाम; फास्ट चार्जिंग, १०८ एमपी कॅमेरासह मिळतंय बरेच काही

रिअलमीचे उपाध्यक्ष माधव शेठ यांनी Realme 10 Pro+ च्या किंमतीबाबत ट्विट केले आहे. हा फोन भारतात ८ डिसेंबर रोजी लाँच होणार आहे.

REALME 10 PRO + फोनची किंमत पाहून रेडमीलाही फुटणार घाम; फास्ट चार्जिंग, १०८ एमपी कॅमेरासह मिळतंय बरेच काही
(pic credit – financial express)

Realme 10 Pro series launch india : बहुप्रतीक्षित रिअलमी १० प्रो सिरीज भारतात ८ डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. ही फोन सिरीज मागील काही दिवसांपासून चर्चेत होती. फोनमध्ये अनोखे डिजाईन आणि जबरदस्त फीचर्स मिळणार असल्याची चर्चा होती. चीनमध्ये अलीकडेच या सिरीजमधील रिअलमी १० प्रो प्लस आणि रिअलमी १० प्रो स्मार्टफोनचे पदार्पण झाले असून, आता भारतातही हे फोन धुमाकूळ घालणार आहेत. दरम्यान रिअलमीचे उपाध्यक्ष माधव शेठ यांनी Realme 10 Pro+ च्या किंमतीबाबत ट्विट केले आहे. यातून फोनची किंमत २५ हजार रुपयांच्या आत असू शकते, असे समजते. तसेच हा फोन कर्व्ह डिस्प्लेसह सादर होणार असल्याची माहितीही मिळते.

शेठ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून त्यातून Realme 10 Pro+ हा २५ हजार रुपयांच्या आत मिळू शकते, असे संकेत दिले आहेत. रिअल मी १० प्रो हा फोन त्याच्या दमदार फीचर्समुळे सध्या चर्चेत आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी १०८० एसओसी प्रोसेसर मिळत असून तो अँड्रॉइड १३ वर आधारीत रिअलमी यूआय ४.० या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो.

(WHATSAPP DATA LEAK : 50 कोटी युजर्सचा डेटा ‘ON SALE’; यात तुम्ही तर नाही ना? असे तपासा)

चीनमध्ये रिअलमी १० प्लस प्रो स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी बेस व्हेरिएंटची किंमत अंदाजे १९ हजार ५०० रुपये आहे. तर १२ जीबी आणि २५६ जीब स्टोअरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत अंदाजे २६ हजार ५०० रुपये आहे. हा फोन नाईट, ओशिन आणि स्टारलाईट या रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

फोनमध्ये मिळतात हे फीचर्स

Realme 10 Pro+ मध्ये ६.७ इंच अमोलेड कर्व्ह डिस्प्ले, अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, माली जी ६८ जीपीयू प्रोसेसरसह मीडियाटेक डायमेन्सिटी १०८० एसओसी प्रोसेसर देण्यात आले आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आले असून त्यात १०८ एमपीचा मेन सेन्सर, ८ एमपीचा अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि २ एमपीचा मोनोक्रोम सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून ड्युअल सीम ५ जी मिळते.

(Flipkart black friday sale : स्मार्टफोन्सवर मोठी सूट, १० हजारांच्या आत मिळवा जबरदस्त फोन, ‘या’ आहेत बेस्ट डिल्स)

फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी ६७ वॉट फास्ट चार्जिंगल सपोर्ट करते. फोनचे वजन जवळपास १७८ ग्राम असून त्यात ड्युअल स्टिरिओ स्पिकर्स मिळतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 14:34 IST
Next Story
WHATSAPP DATA LEAK : 50 कोटी युजर्सचा डेटा ‘ON SALE’; यात तुम्ही तर नाही ना? असे तपासा