Whatsapp data leak : ५० कोटी व्हॉट्सअ‍ॅप युजरचा डेटा डार्कवेबवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती सायबरन्यूजने दिली आहे. अहवालानुसार, एका हॅकिंग कम्युनिटी फॉरममध्ये पोस्ट करण्यात आलेल्या जाहिरातीत विक्रीबाबत माहिती देण्यात आली असून, त्यात डेटामध्ये युजर्सचा मोबाईक क्रमांकही असल्याचा दावा करण्यात आला आहे.

जगातील ८४ दशांतील व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची त्यात माहिती असून ही माहिती हॅकर्सच्या हाती कशी लागली? याबात माहिती नाही. मात्र, युजरची माहिती लिक होणे ही धोक्याची घंटा आहे. हॅकर्स आणि इतर समाजकंटकांद्वारे या माहितीचा गैरफायदा घेण्याचा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे, युजर्सनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तुमचा ईमेल आयडी किंवा फोन नंबर चोरी झाला आहे की नाही, हे तपसण्यासाठी पुढील उपाय करून तुम्ही तुमचे खाते सुरक्षित करू शकता.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या
do you drink sugarcane juice in summer
Sugarcane : उन्हाळ्यात उसाचा रस पिताय? जाणून घ्या, उसाचे सेवन करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?
how to make Pooris Without Rolling Pin
लाटणं न वापरता झटपट बनवा टम्म फुगणारी गोल पुरी! वेळ वाचवण्याचा देशी जुगाड, पाहा Viral Video

(३२ तासांची बॅटरी लाइफ, वाढवू शकता रॅम; LAVA BLAZE NXT ग्राहकांसाठी सादर, जाणून घ्या किंमत)

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांनी काळजी घेण्याची गरज का?

हॅकर्स तुमच्या माहितीचा गैरवापर करू शकतात. हॅकर्स या माहितीद्वारे स्मिशिंग आणि विशिंग हल्ले करतात. यामध्ये सायबर घोटाळे करणारे लोकांना मेसेज, ईमेल किंवा व्हॉइसमेलच्या माध्यमातून लिंक पाठवतात आणि ती लिंक क्लिक केल्यास आर्थिक फसवणुकीचा प्रकार घडतो. म्हणून सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी युजर्सना अज्ञात क्रमांकावरून आलेला कॉल, अनपेक्षित मेसेजसपासून (एमएमएस किंवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज) सावध राहण्याची शिफारस केली आहे. अशा मेसेजवर किंवा व्हॉइस आधारित मेसेजला प्रतिसाद देणे धोकादायक असून, त्यामुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते.

तुमचा ईमेल आयडी/फोन क्रमांक लिक झाला हे कसे तपासायचे?

तुमचा डेटा हॅक झाला आहे की नाही? हे तुम्ही सायबरन्यूज संकेतस्थळावर जाऊन तपासू शकता. संकेतस्थळावर एक लिंक आहे जी युजरला त्याचा फोन क्रमांक हॅक झाला आहे की नाही? याबाबत माहिती देते. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

(Flipkart black friday sale : स्मार्टफोन्सवर मोठी सूट, १० हजारांच्या आत मिळवा जबरदस्त फोन, ‘या’ आहेत बेस्ट डिल्स)

  • डेटा हॅक झाला की नाही हे तपासण्यासाठी सायबरन्यूज संकेतस्थळावर जा.
  • संकेतस्थळावरील टुल्स अंतर्गत पर्सनल डेटा लिक चेकरवर क्लिक करा.
  • यानंतर सर्च फिल्डमध्ये ईमेल अ‍ॅड्रेस किंवा फोन क्रमांक टाका आणि चेक नाऊवर क्लिक करा.
  • क्लिक केल्यावर तुमचा ईमेल आयडी किंवा फोन क्रमांक हॅक झाला हे की नाही याबाबत संकेतस्थळ माहिती देईल.

कोणत्या हल्ल्यात माहिती हॅक झाली आहे त्याची माहिती हे संकेतस्थळ देते. तुमचा ईमेल आयडी हॅक झाला असल्यास तुम्ही पासवर्ड बदलून त्यास सुरक्षित करू शकता.