Redmi 5G स्मार्टफोन मिळतोय बेस्ट ऑफरसह; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही..

रेडमी कंपनीचा एक लोकप्रिय स्मार्टफोन देखील ‘या’ सेलमध्ये उत्तम ऑफरसह उपलब्ध आहे.

Redmi 5G स्मार्टफोन मिळतोय बेस्ट ऑफरसह; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही..
(प्रातिनिधीक फोटो)

कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेण्याआधी आपण त्याच्या बेस्ट ऑफरचा शोध घेतो. ज्यामुळे आपल्याला कमी किंमतीत उत्तम पर्याय उपलब्ध होतात. सध्या अमेझॉनवर असाच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सेल सुरू आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर उत्तम ऑफर सुरू आहेत. यामध्ये स्मार्टफोन, इयरबड्स, वायर असलेले इयरफोन या वस्तुंचा समावेश आहे. रेडमी कंपनीचा एक लोकप्रिय स्मार्टफोन देखील या सेलमध्ये उत्तम ऑफरसह उपलब्ध आहे. जर तुम्ही नवा मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

रेडमीचा १० टी ५जी हा लोकप्रिय स्मार्टफोन अमेझॉनवरील सेलमध्ये कमी किंमतीत उपलब्ध आहे. १६,९९९ रुपये किंमत असणारा हा फोन अमेझॉनवर ११,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ९०Hz डिस्प्ले आणि मीडियाटेक डायमेंसिटी ७०० ७nm प्रोसेसर हे या फोनचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यासह ग्राहकांना आकर्षक करणारे फोनचे वैशिष्ट्य म्हणजे या स्मार्टफोनची बॅटरी. रेडमीच्या १० टी ५जी या मॉडेलमध्ये ५००० एमएएचची बॅटरी आहे, जी २२ आठवडयांच्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे.

आणखी वाचा – लॅपटॉपमध्ये लिंकशिवाय वापरता येणार व्हॉटसॲप? काय आहे नवे फीचर जाणून घ्या

या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा १०८०p एलसीडी डिस्प्ले आहे. जो ९०Hz अडैप्टिव रिफ्रेश रेटसह उपलब्ध होतो. तसेच यामध्ये ६जीबी रॅमसह १२८जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. मेटॅलिक ब्लू, मिंट ग्रीन, क्रोमियम व्हाइट आणि ग्रेफाइट ब्लॅक या रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
फक्त २००० रुपयांमध्ये मिळणार Jio Phone 5G! जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनचे ‘हे’ असतील फीचर्स
फोटो गॅलरी