भारतीय कार मार्केट हे जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मार्केटपैकी एक आहे. भारतीय कार मार्केटमध्ये ३ लाख ते १० लाख या रेंजमध्ये जास्त विकली जाते. एंट्री-लेवल, सब-कॉम्पैक्ट, कॉम्पैक्ट या मॉडल्सची मागणी जास्त आहे. युवा पिढीचा कल या मॉडल्सकडे जास्त असलेला पाहायला मिळतो.

कोणती गाडी विकत घायची यामागे ट्रान्समिशनचा पर्याय महत्वाचा मानला जातो. कारण त्यावरून कोणती गाडी घ्यायची हे ठरवले जाते. मागील काही वर्षांपासून ऑटोमॅटिक कारची मागणी वाढली आहे. जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रामुख्याने मॅन्युअल ट्रान्समिशन कारपेक्षा ऑटोमॅटिक कारला प्राधान्य दिले जाते. सध्या मार्केटमध्ये ऑटोमॅटिक कारचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी टॉप पाच ऑटोमॅटिक कार कोणत्या आहेत जाणून घेऊया.

Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

आणखी वाचा – फक्त १० हजार रुपये देऊन घरी घेऊन या Hero Electric Scooter; जाणून घ्या महिन्याला किती रुपयांचा EMI भरावा लागणार

मारुती सुजुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift)

मारुती सुजुकी स्विफ्ट ही कार भारतातील लोकप्रिय कारपैकी एक आहे. मारुती सुजुकी स्विफ्ट १.२ लीटर पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही गियरबॉक्स पर्यायासह उपलब्ध आहे. याचे मायलेज २३.२ किमी प्रतिलिटर ते २३.७६ प्रतिलिटर या रेंजमध्ये आहे. याची किंमत ५.९० लाख रुपये ते ८.७७ लाख रुपये (एक्स-शोरूम) यादरम्यान आहे.

टाटा पंच (Tata Punch)

टाटा पंच नवीन सब-कॉम्पैक्ट एसयूवी आहे, माइक्रो-एसयूवी प्रकरातील आहे. या कारमध्ये १.२ लिटर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन मॅन्युअल आणि गिअरबॉक्स या दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे. हे इंजिन १८.८२ किमी प्रति लिटर ते १८.९७ या रेंजमध्ये मायलेज देते. टाटा पंच एसयूवी ५.६४ लाख रुपये आणि ८.९८ लाख रुपये (एक्स-शोरूम) या किंमतीमध्ये उपलब्ध आहे.

टाटा टियागो (Tata Tiago)

टाटा टियागोने भारतातील टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारच्या विक्रीचा वेग बदलला. ही कार १.२ पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक या दोन्ही गिअरबॉक्स पर्यायांमध्ये उपलब्ध असते. ही कार ५.१९ लाख रुपये ते ७.६४ लाख रूपये (एक्स-शोरूम) या किंमतीमध्ये उपलब्ध आहे.

मारुती सुजुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno)

मारुती सुजुकी बलेनो ही कार नेक्सा रिटेल नेटवर्कद्वारे विकली जाते. याची किंमत ६.१४ लाख रुपये ते ९.६६ लाख रुपये (एक्स-शोरूम) या रेंजमध्ये आहे. १.२ लिटर पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक हे दोन्ही गिअरबॉक्स पर्याय या गाडीत उपलब्ध आहेत. ही कार १९.५६ किमी प्रति लिटर ते २३.८७ किमी प्रति लिटर यादरम्यान मायलेज देते.

आणखी वाचा – कारमध्ये एअरबॅग्सची संख्या वाढणार; एका एअरबॅगसाठी किती खर्च येतो तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

निसान मेग्नाइट (Nissan Magnite)

आकर्षक लूक आणि प्रीमियम वैशिष्ट्यांमुळे निसान मेग्नाइट ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाडीची किंमत ५.७६ लाख रुपये ते १०.१५ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. १.० लिटर पेट्रोल इंजिनसह ही कार २३ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.