रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.रिलायन्स जिओनेच प्रथम देशामध्ये ५जी नेटवर्क सुरु केले आहे. २०२३ च्या अखेरपर्यंत देशातील सर्व भागांमध्ये ५ जी नेटवर्क सुरु करण्याचे जिओचे लक्ष्य आहे. तसेच आपल्या ग्राहकांसाठी कंपनीकडे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. ज्यात ग्राहकांना अनेक फायदे देखील मिळतात. कंपनीकडे १ महिना , तीन महिने आणि वर्षभर अशा प्रकारच्या वैधतेसाठी अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. रिलायन्स जिओकडे २,५४५ आणि २,९९९ रुपयांचे प्लॅन्स आहेत. ज्याची वैधता वर्षभर आहे. त्या रिचार्ज प्लॅन्सबद्दल अधिक जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिलायन्स जिओचे २,४४५ आणि २,९९९ रुपयांचे प्लॅन्समध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. यामध्ये ज्या ठिकाणी ५जी नेटवर्क उपलब्ध आहे तिथे ग्राहक ५जी अनलिमिटेडचा लाभ घेऊ शकतात. या दोन्ही प्लॅन्स आणि त्यामध्ये मिळणारे फायदे पाहुयात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा : VIDEO: Nokia ने लॉन्च केला १५ हजारांच्या आतील ‘हा’ जबरदस्त ५ जी स्मार्टफोन; फीचर्स एकदा पाहाच

रिलायन्स जिओचा २,५४५ रुपयांचा प्लॅन

जिओच्या २५४५ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करता येणार आहेत. वापरकर्त्यांना जिओसिनेमा, जिओटीव्ही आणि जिओ क्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण ५०४ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता ३३६ दिवसांची आहे. आपल्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त २,९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मर्यादित कालावधीसाठी कंपनीने अतिरिक्त फायदे ऑफर केले आहेत.

रिलायन्स जिओचा २,९९९ रुपयांचा प्लॅन

जिओच्या २,९९९ चा हा प्लॅन सर्वात महागडा प्लॅन आहे. टेलिकॉम कंपनी या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा ऑफर करते. तसेच दररोज १०० एसएमएस अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग देखील ऑफर करते. तसेच जीओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊड असे अतिरिक्त फायदे देखील मिळतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio 2545 and 2999 rs rechage plans jio tv unlimited call jiocloud check all benifits tmb 01