रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी कायमच नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत असते. ज्यात वापरकट्यानं अनेक फायदे मिळतात. मात्र आता जिओ वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. रिलायन्स जिओने आपल्या ऑफरमधून ११९ रुपयांचा प्लॅन काढून टाकला आहे. यामध्ये १४ दिवसांची वैधता, दररोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याचे फायदे वापरकर्त्यांना मिळत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता हा प्लॅन देशातील कोणत्याही भागातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नसणार आहे. कंपनीने ११९ रुपयांचा सर्वात परवडणारा बंद केला असून नवीन प्लॅन ऑफर केला आहे. हे पाऊल याआधी एअरटेलनेदेखील उचलले होते. यामुळे कंपनीला प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) सुधारण्यास मदत होणार आहे. रिलायन्स जिओचा आता सर्वात परवडणारा प्लॅन हा १४९ रुपयांचा असणार आहे. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा : JioBharat 4G फोनच्या सेलला सुरूवात; ‘या’ ठिकाणी आहे उपलब्ध, किंमत व फीचर्स एकदा पाहाच

रिलायन्स जिओचा १४९ रूपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना २० दिवसांची वैधता मिळते. तसेच जिओसिनेमा , जिओक्लाऊड आणि जिओ टीव्ही या फायद्यांसह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोजचा १ जीबी डेटा वापरायला मिळतो. हा प्लॅन घेणारे वापरकर्ते जिओ वेलकम ऑफरसाठी पात्र नाहीत. 

या कारणासाठी बंद केला प्लॅन

रिलायन्स जिओच्या नफ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपनी असलेली रिलायन्स जिओ मागील काही काळापासून प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) सुधारण्यासाठी संघर्ष करत आहे. Q1 FY24 च्या शेवटी जिओचा ARPU १८०.५ रुपये होता. जिओचे ४०० मिलियनपेक्षा अधिक एकूण सक्रिय वापरकर्ते आहेत. तथापि ११९ रुपयांचा प्लॅन जिओचा ARRU वाढवण्यास मदत करत नाही. यामुळे कंपनीने बंद केला हा निर्णय कंपनीसाठी फायदेशीर ठरेल. १४९ रुपयांच्या प्लॅनमुळे कंपनीचा ARRU वाढण्यास मदत होईल. मात्र वाढलेल्या किंमतीमुळे ग्राहकांची संख्या कमी होईल की नाही ते ही पाहणे महत्वाचे ठरेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio remove 119 rs plan and launch 149 rs plan because increase average revenue per user tmb 01