सध्या देशभरामध्ये IPl २०२३ सुरु आहे. आयपीएल म्हणजे भारतीयांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते. आयपीएलचा आनंद आता टीव्हीपेक्षा डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेतला जात आहे. गेल्या २ वर्षांपासून, जिओ सिनेमा आयपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण करत आहे. आता प्रेक्षक टीव्हीपेक्षा जास्त Jio सिनेमाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामना पाहत आहेत. आता चाहत्यांची मजा आणखी द्विगुणित होणार आहे. कारण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा जिओ सिनेमाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनला आहे. त्याची लोकप्रियता या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला अधिक गती देण्यास मदत करेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिटमॅन रोहित शर्मा आधुनिक युगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. रोहित शर्माने कर्णधार आणि खेळाडू म्हणून अनेक जागतिक विक्रम नोंदवले आहेत. JioCinema कॅम्पेनशी जोडले गेल्यावर रोहित शर्मा म्हणाला, ”JioCinema भारतामध्ये मोबाईल फोन आणि कनेक्टड टीव्हीवर खेळ पाहण्याची पद्धत बदलण्यासाठी माध्यम म्हणून उदयास येत आहे.” मला जिओ सिनेमाशी जोडल्याबद्दल आणि या प्रवासाचा एक भाग होऊन मी खूप खुश आहे. कारण हे डिजिटल प्लॅटफॉर्म क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या इच्छेनुसार लवचिकता प्रदान करत आहे.

हेही वाचा : HCLTech मध्ये ८५ टक्के कर्मचाऱ्यांना मिळणार Variable Pay; CPO राम सुदंरराजन म्हणाले, “आर्थिक वर्ष…”

वायकॉम १८ स्पोर्ट्सचे सीईओ अनिल जयराज यांनी सांगितले, रोहित जिओ सिनेमाच्या टीमसोबत काम करेल. देशभरात चाहत्यांच्या संख्येचा विस्तार करताना ते सर्व प्रीमियम खेळांसाठी जिओ सिनेमाला प्रीमियर डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्यावर काम करतील. रोहित शर्मा हे खिलाडूवृत्तीचे आणि अतुलनीय नेतृत्वाचे प्रतीक आहे. तो चाहत्यांना आणि खेळाडूंना प्रिय असलेल्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करतो.

तो चाहत्यांना आणि खेळाडूंना प्रिय असलेल्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करतो. आमचे खेळाचे सादरीकरण आणि सध्या सुरू असलेल्या टाटा आयपीएलमध्ये चाहत्यांशी संपर्क साधण्याची रोहितची क्षमता यामध्ये समन्वय आहे. ही भागीदारी भारताला एका रोमांचक भविष्याच्या मार्गावर पुढे नेण्याच्या आमच्या प्रयत्नांचा नैसर्गिक विस्तार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma jiocinema announced brand ambassador tata ipl 2023 start sports tmb 01