भारतात सणासुदीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आता अवघ्या काही दिवसांच्या अंतराने आपल्याला अनेक मोठे सण पाहायला मिळतील. सणासुदीच्या काळात स्मार्ट एलईडी टीव्हीसह नवनवीन उत्पादने भरपूर खरेदी केली जातात. ज्यांना एलईडी टीव्ही खरेदी करायची असते, त्यांचे लक्ष कमीतकमी किमतीमध्ये जास्तीत जास्त फीचर्स देणाऱ्या टीव्हीकडे असते. मात्र असे होणे शक्य नाही. म्हणूनच आज आपण सर्वात स्वस्त ३२ इंच एलईडी टीव्हीबद्दल जाणून घेणार आहोत, जे आपण फ्लिपकार्टवरूनही खरेदी करू शकतो.
- अॅडसन ३२ इंच एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड बेस्ड टीव्ही (Adsun 32 inch HD Ready LED Smart Android Based TV)
हा टीव्ही वायफाय सपोर्टसोबतच क्वाड कोअर प्रोसेसरसह बाजारात दाखल करण्यात आला आहे. या स्मार्ट एलईडी टीव्हीमधील उत्कृष्ट कलर पॉप आणि ब्राइटनेसमुळे ग्राहकांना एक जबरदस्त अनुभव मिळतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये २० वॉट ऑडिओ सपोर्ट आणि ६० हॅट्झ रिफ्रेश रेट आहे. ग्राहकांनी या स्मार्ट एलईडी टीव्हीला फ्लिपकार्टवर ३.८ स्टार रेटिंग दिले आहे आणि त्याचे रिव्ह्यूदेखील खूप चांगले आहे.
जर तुमच्या घरात अनेक खोल्या असतील आणि तुम्हाला प्रत्येक खोलीसाठी स्मार्ट एलईडी टीव्ही घ्यायचा असेल, तर हा टीव्ही खरेदी करणे तुमच्यासाठी किफायतशीर ठरेल. तसेच तुम्हाला या टीव्हीमध्ये अनेक दमदार फीचर्स मिळतील. फ्लिपकार्टवर या स्मार्ट टीव्हीची किंमत केवळ ८,२९९ रुपये आहे.
- इनफिनिक्स ३२ इंच एचडी रेडी एलईडी स्मार्ट लिनक्स टीव्ही (Infinix 32 inch HD Ready LED Smart Linux TV)
अलीकडच्या काळात इनफिनिक्स हा एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून उदयास आला आहे. या ब्रँडने आता टेलिव्हिजन मार्केटही काबीज केले आहे. कंपनीने अत्यंत माफक दरात हा स्मार्ट टीव्ही भारतीय ग्राहकांसमोर सादर केला आहे. हा बेझल-लेस स्मार्ट एलईडी टीव्ही आहे, ज्यामध्ये ग्राहकांना क्रिस्टल क्लिअर पिक्चर क्वालिटी पाहायला मिळते.
Jio 5G असणार 4G पेक्षाही स्वस्त? जाणून घ्या, नव्या Tariff Planची अपेक्षित किंमत
तसेच तुम्हाला त्यात एक स्मार्ट क्वाड कोर प्रोसेसर देखील मिळतो. यामध्ये तुम्हाला २० वॉटचा डॉल्बी ऑडिओ आणि अनेक प्री बिल्ट ओटीटी अॅप्स पाहायला मिळतात. फ्लिपकार्टवर या स्मार्ट टीव्हीची किंमत केवळ ८,९९९ रुपये आहे.