Elon Musk यांनी ट्विटरची खरेदी केल्यापासून कंपनीमध्ये अनेक निर्णय घेतले आहेत. ब्लू टिक, कर्मचारी कपात, नवीन सीईओची घोषणा असे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत. अलीकडेच मस्क यांनी आपल्या वापरकर्त्यांसाठी ‘रिडींग लिमिट’ पॉलिसीची घोषणा केली आहे. वापरकर्ते आता दररोज केवळ मर्यादित संख्येत ट्वीट वाचू शकतील असे मस्क यांचे म्हणणे आहे. या निर्णयाबाबत ट्विटरचे वापरकर्ते चर्चा करत आहेत. यासहिवाय ट्विटरने नुकतेच वापरकर्त्यांसाठी पिक्चर-इन-पिक्चर (picture-in-picture) फिचर आणले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरवर iSoftware अपडेट्सद्वारा शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओनुसार, अ‍ॅपमध्ये व्हिडीओ प्ले केल्यांनतर होम स्क्रीनवर गेल्यानंतरही व्हिडीओ प्ले होत राहणार आहे. हे फंक्शन युट्युब आणि व्हॉट्सअ‍ॅपवर ज्या पद्धतीने चालते तसेच काम करणार आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

हेही वाचा : Twitter ला टक्कर देण्यासाठी Meta आणणार ‘हे’ नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, या आठवड्यातच लॉन्च होण्याची शक्यता

या नवीन पिक्चर-इन-पिक्चर फीचरच्या मदतीने ट्विटर वापरकर्ते व्हिडीओ पाहत असताना अन्य Apps चा वापर करू शकणार आहेत. ट्विटर हळूहळू हे फिचर रोलआऊट करताना दिसत आहे. यामुळे कदाचित हे फिचर प्रत्येक डिव्हाइसपर्यंत पोचण्यास थोडा कालावधी लागू शकतो. ट्विटरने पिक्चर-इन-पिक्चर हे फिचर सध्या iOS वापरकर्त्यांसाठी रोलआऊट केले आहे.

जगभरातील ट्विटर वापरकर्त्यांना काही दिवसांपूर्वी मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटवर समस्यांचा सामना करावा लागला होता. वापरकर्त्यांना त्यांच्या फिडमध्ये ट्वीट पाहू शकत नव्हते. याआधी सोशल मीडिया साईटवरदेखील ‘तात्पुरती आणीबाणी उपाय’ (temporary emergency measure) देखील लागू करण्यात आले होते. आता त्याचे धोरण बदलले. आता ट्वीट पाहण्यासाठी वापरकर्त्यांकडे अकाउंट असणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter launch picture in picture feature for ios users like youtube and whatsapp for video tmb 01
First published on: 04-07-2023 at 11:57 IST