वोडाफोन-आयडिया देशातील तिसरी टेलिकॉम कंपनी आहे. वोडाफोन आयडिया कंपनीला अजून आपले ५जी नेटवर्क लॉन्च करता आलेले नाही. मात्र ते लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. व्हीआय कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन रिचार्ज प्लॅन्स आणत असते. त्यामध्येक प्लॅन आहे तो म्हणजे ४७५ रूपयांचा. या प्लॅनमधील एक खास गोष्ट ग्राहकांना मिळते जी दुसऱ्या कोणत्याही खाजगी टेलिकॉम कंपनीकडून आपल्या वापरकर्त्यांना ऑफर केली जात नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वोडाफोन – आयडिया ४७५ रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणती खास गोष्ट ऑफर करते ते आपण जाणून घेणारच आहोत. मात्र व्हीआयच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांसाठी अनेक डेटाचे फायदे मिळतात. टेलिकॉम कंपनी आपले प्लॅन्स व्हीआय हिरो अनलिमिटेडच्या फायद्यांसह प्रदान करते. ज्यात विकेंड डेटा रोलओव्हर, बिंज ऑल नाइट आणि डेटा डिलाइट्स या तीन गोष्टींचा समावेश होतो. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा :Infinix चा १०८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला ‘हा’ स्मार्टफोन लॉन्च; ३० मिनिटांत होणार…, ऑफर्स एकदा पाहाच

व्हीआयचा ४७५ रूपयांचा प्रीपेड प्लॅन

व्हीआयच्या ४७५ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ वापरकर्त्यांना मिळते. मात्र या प्लॅनमध्ये ग्राहकांना मिळणारी खास गोष्ट म्हणजे यात ग्राहकांना पूर्ण प्लॅन संपेपर्यंत दररोज ४ जीबी डेटा वापरायला मिळतो. म्हणजे २८ दिवसांमध्ये तुम्हाला ११२ जीबी डेटा वापरायला मिळतो. इतकेच नाही तर एकूण २ जीबी अतिरिक्त डेटा मिळवण्यासाठी तुम्ही डेटा डिलाइट्सचा लाभ देखील घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही Binge All Night म्हणजेच रात्री १२ ते पहाटे ६ दरम्यान अनलिमिटेड डेटा वापरू शकता. यामुळे तुमच्या दररोजच्या डेटावर परिणाम होत नाही.

डेटा फायद्यांशिवाय हा प्लॅन अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज या फायद्यांसह येतो. व्हीआय मुव्हीज आणि टीव्ही VIP चा एक ओटीटी फायदा देखील या प्लॅनमध्ये आहे. जर का तुम्ही व्हीआय App चा उपयोग हा प्लॅन खरेदी करत असाल तर तुम्ही या प्लॅनसह ५ जीबी मोफत बोनस डेटा मिळवण्यासाठी पात्र असणार आहात. तथापि, ५जी बोनस डेटा ग्राहकांसाठी केवळ पहिले ३ दिवस उपलब्ध होईल. FUP डेटा वापरल्यानंतर ग्राहकांचा डेटा स्पीड ६४ kbps पर्यंत कमी होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vodafone idea 475 rs prepaid plan 4 gb deta with weekend unlimited voice calls tmb 01