Vodafone Idea Offering 75GB Free Data: व्होडाफोन आयडियाने आपल्या प्रीपेड ग्राहकांना एक अप्रतिम भेट दिली आहे. देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर व्होडाफोन आयडिया आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये ७५ जीबी मोफत डेटा आणि Disney+Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. यात ओटीटी सबस्क्रिप्शन आणि इतर सेवा मिळत आहेत. टेलिकॉम कंपनीने आपल्या ३०९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये मर्यादा कालावधीपर्यंत हा लाभ देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच, जर ग्राहकांनी १५ ते ३० नोव्हेंबर २०२२ दरम्यान हा प्लॅन रिचार्ज केला तर त्यांना मोफत फायदे मिळणार आहेत. या योजनांचे तपशील जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असा आहे व्होडाफोन आयडियाचा प्लॅन

३०९९ रुपयांचा व्होडाफोन आयडिया प्लॅन
व्होडाफोन आयडियाच्या ३०९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये दररोज अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ७५ जीबी बोनस डेटा आणि Disney + Hotstar Mobile चे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये Vi Hero Unlimited लाभ आणि Vi Movies आणि TV VIP अॅक्सेस देखील मोफत देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध सर्व डेटा संपल्यानंतर, वापरकर्ते ६४Kbps च्या वेगाने डेटा वापरू शकतात. या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता एक वर्ष म्हणजेच ३६५ दिवसांची आहे.

आणखी वाचा : Jio चा बंपर धमाका: ‘या’ प्लॅनमध्ये ग्राहकांना मिळेल भरपूर डेटासह आणखी बरंच काही, पाहा काय आहे ऑफर

१४९९ रुपयांचा व्होडाफोन आयडिया प्लॅन

व्होडाफोन आयडियाचा हा रिचार्ज प्लान १८० दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये यूजर्सना ५० जीबी बोनस डेटा मिळतो. याशिवाय या रिचार्ज प्लॅनमध्ये नियमित फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि १.५ जीबी डेटा उपलब्ध आहे. यासह, वापरकर्त्यांना Vi Hero Unlimited ऑफरचा लाभ मिळेल.

२८९९रुपयांचा व्होडाफोन आयडिया प्लॅन

व्होडाफोन आयडियाच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना ७५ जीबी बोनस डेटा देखील मिळतो. त्याची वैधता ३६५ दिवस आहे. यामध्ये यूजर्सना दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज मिळतात. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलताना, वापरकर्त्यांना या रिचार्ज प्लॅनमध्ये Vi Movies & TV VIP आणि Vi Hero Unlimited ऑफर मिळतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vodafone idea customers will get free disneyhotstar subscription with 75 gb data pdb