मोबाईल आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेले व्हॉटसअॅप आता नव्याने अपडेट झाले आहे. व्हॉट्सअॅपच्या या नव्या व्हर्जनमध्ये युजर्सना वर्ड फाईलप्रमाणे विशिष्ट अक्षराला किंवा वाक्याला बोल्ड, इटॅलिक किंवा स्ट्राईकथ्रू करता येणार आहे. यामध्ये शब्दाच्या सुरूवातीला आणि अखेरीस * हे चिन्ह (asterisk) टाकून शब्द किंवा वाक्य बोल्ड करता येईल. याशिवाय, अक्षरांच्या मागेपुढे _(अंडरस्कोअर) टाईप केल्यास संबंधित वाक्य इटॅलिकमध्ये दिसेल. तसेच ~ (टिल्ड) हे चिन्ह वापरून अक्षरांना स्ट्राईकथ्रू इफेक्ट देता येईल. हे फिचर्स व्हॉट्सअॅपच्या २.२.५३५ या व्हर्जनमध्ये उपलब्ध असतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New features of whatsapp