ठाण्यातील श्रीनगर भागातील एअर इंडियाच्या कॉल सेंटरमध्ये आयएसआय अतिरेकी संघटनेच्या नावाने दूरध्वनी आल्याने शुक्रवारी एकच खळबळ उडाली. २८ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करण्यात येणार असल्याची धमकी दूरध्वनीवर देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा माग काढण्यास सुरुवात केली असून मध्य प्रदेशातून हा दूरध्वनी आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
ठाणे येथील श्रीनगर भागात एअर इंडियाचे कॉल सेंटर असून तेथील टोल फ्री क्रमांकावर देश-विदेशातून दूरध्वनी येतात. शुक्रवारी रात्री उशिरा कॉल सेंटरमध्ये एक निनावी दूरध्वनी आला. आयएसआय अतिरेकी संघटनेतून बोलत असल्याचे सांगून त्याने एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करणार असल्याची धमकी दिली. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2015 रोजी प्रकाशित
एअर इंडिया विमान अपहरणाची धमकी
ठाणे येथील श्रीनगर भागात एअर इंडियाचे कॉल सेंटर असून तेथील टोल फ्री क्रमांकावर देश-विदेशातून दूरध्वनी येतात.
Written by मंदार गुरव

First published on: 24-11-2015 at 05:34 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india plane abduction threat