‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ आणि ‘डी. एच. गोखले आणि श्यामला गोखले न्यासा’च्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘अंत्योदय पुरस्कार’ यंदा सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असलेल्यांसाठी काम करणाऱ्या सुरेश पाटील यांना जाहीर झाला आहे. ५ एप्रिलला वडाळ्यातील प्रबोधिनीच्या चंचल स्मृती कार्यालयातील डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
एक लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि शाल-श्रीफळ हे पुरस्काराचे स्वरुप आहे. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय ओक यांच्या मुख्य उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात येणार आहे.