प्रत्येक युवक-युवतीने आपला वाढदिवस ‘बर्थ डे’ ऐवजी ‘वर्थ डे’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी केले आहे. ठाण्यातील कै. वामनराव ओक रक्तपेढी आयोजित व्हॅलेंटाइन डे निमित्त रक्तदान कार्यक्रमात ते बोलत होते.
ठाण्यातील घंटाळी भागात पार पडलेल्या या कार्यक्रमात साठ जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमात रक्तगट, रक्त सूची आणि प्लेटलेट सूची आदींची तपासणी करण्यात आली. या उपक्रमाला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी उपस्थित असलेले ठाण्याचे सह पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण, दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी या तिघांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच या तिन्ही मान्यवरांनी आपल्या नावाची ऑनलाइन रक्तगट व प्लेटलेट सूचीत नोंदणी केली. लक्ष्मीनारायण यांनी आतापर्यंत ५२ वेळा रक्तदान केले असून ते थॅलेसेमिया रुग्णांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतात.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2015 रोजी प्रकाशित
‘रक्तदानाने वाढदिवस साजरा करा’
प्रत्येक युवक-युवतीने आपला वाढदिवस ‘बर्थ डे’ ऐवजी ‘वर्थ डे’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी केले आहे.
First published on: 17-02-2015 at 12:02 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birthday celebrate with blood donation