कुळगांव-बदलापूर निवडणुकीचे वातावरण सध्या तापले असून येत्या २२ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारांना प्रलोभने देण्याचे काम उमेदवारांकडून होत आहे. असाच प्रकार बदलापुरात घडला असून निवडणूक आचारसंहिता भंगाचा गुन्हा बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक जण फरार आहे.
मतदारांना प्रलोभने दाखविण्याच्या हेतूने म्हाडा कॉलनी, बदलापूर (पू.) येथे साडय़ांचे वाटप करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली असता पोलीस व निवडणूक आचारसंहिता भरारी पथकांनी कारवाई केली.
याप्रकरणी दीपक वाघमारे व संजय राठोड मोफत साडय़ा वाटून मतदारांना प्रलोभन दाखवत असल्याचे निदर्शनास आल्याने या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
यात रविचंद चव्हाण हा आरोपी फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस कॉन्स्टेबल दादाराव बंडगर यांनी फिर्याद नोंदविली आहे.
यावरून ही कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक एल. एस. आंबोळे हे अधिक तपास करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2015 रोजी प्रकाशित
बदलापुरात आचारसंहिता भंग
कुळगांव-बदलापूर निवडणुकीचे वातावरण सध्या तापले असून येत्या २२ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारांना प्रलोभने देण्याचे काम उमेदवारांकडून होत आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-04-2015 at 12:04 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Breach of the code of conduct in badlapur