कल्याण येथे राहणाऱ्या नीलेश हरीश शेलवले (१९) याची ५० हजार किमतीची मोटारसायकल घराजवळून चोरटय़ाने चोरून नेली. उल्हासनगर येथे राहणाऱ्या कमल तोतदास बांगा (६४) यांची ३५ हजार किमतीची मोटारसायकल कल्याण स्कॉयवॉकखालून चोरीस गेली. कल्याण येथे राहणाऱ्या शैलेश शशी नायर (२५) यांची ९७ हजार किमतीची तसेच याच परिसरात राहणाऱ्या आणखी एका व्यक्तीची एक लाख ३३ हजार किमतीची मोटारसायकल त्यांच्या घराजवळून चोरटय़ांनी चोरून नेली. अंबरनाथ येथे राहणाऱ्या महेंद्र नाथा पाटील (३६) यांची ४० हजार किमतीची मोटारसायकल चोरटय़ाने चोरून नेली. उल्हासनगर येथे राहणाऱ्या विनोद नेनुमल गंगवानी (३९) यांची गोल मैदान परिसरातून २० हजार किमतीची मोटारसायकल चोरीस गेली. या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ठाणे पोलिस आयुक्तांनी गेल्या आठवडय़ात पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दुचाकीचोरी तसेच सोनसाखळी चोरांना नेस्तनाबूत करण्यासाठी उपाययोजना आखण्याचे आदेश दिले होते. त्याबाबत कारवाईची नागरिकांना अपेक्षा आहे.
ठाणे जिल्ह्यात तीन घरफोडय़ा
ठाणे : कळवा येथे राहणाऱ्या कौस्तुभ विनायक माधवी (२७) यांच्या घरात सोमवारी चोरी झाली. शयनगृहाच्या खिडकीचे लोखंडी गज कापून चोरटय़ाने घरात प्रवेश करून रोख, मोबाइल फोन असा २० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डोंबिवली येथे राहणाऱ्या अंकिता संदीप पाटील (२२) यांच्या घरी सोमवारी चोरटय़ाने ६७ हजारांचा ऐवज लुटून नेला. घराची कडी वाकवून चोरटय़ांनी घरात प्रवेश करून ही चोरी केली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगरात सुशीला रामचंद्र ठाकूर (७०) यांच्या घरी शुक्रवारी चोरी झाली. घराचा दरवाजा फोडून चोरटय़ांनी आत प्रवेश केला. त्यानंतर रोख रक्कम, दागिने असा एक लाख २३ हजार रुपयांचा ऐवज लुटला.
घोडबंदर येथे कारमधून लॅपटॉपची चोरी
ठाणे : येथील घोडबंदर रोड भागात राहणाऱ्या प्रवीण मारुती जाधव (४२) यांच्या कारमधून लॅपटॉप चोरीला गेला. मानपाडा भागातील गार्डन व्ह्यू हॉटेलसमोर गाडी उभी करून जाधव जेवण करण्यासाठी आत गेले होते. त्या वेळी चोरटय़ाने कारची काच फोडून ४० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी मात्र त्याविरोधात अद्याप मोहिम हाती घेतली नसल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2015 रोजी प्रकाशित
गुन्हेवृत्त : दुचाकीचोरांचा धुमाकूळ सुरूच
कल्याण येथे राहणाऱ्या नीलेश हरीश शेलवले (१९) याची ५० हजार किमतीची मोटारसायकल घराजवळून चोरटय़ाने चोरून नेली.
First published on: 25-02-2015 at 12:01 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime news from thane city