ठाणे – ठाणे महापालिकेच्या टेमघर येथील पाणीपुरवठा केंद्राच्या मुख्य जलवाहिनीच्या झडपांच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी ९ वाजता हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असून हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री ९ वाजता पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. मात्र, या कामानंतर सुमारे दोन दिवस शहराला होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याने शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.