कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील गृहनिर्माण सोसायटीतील सदस्यांनी करोना प्रतिबंधाचे नियम कठोरपणे पाळले नाहीत तर त्यांना पहिल्या चुकीपासून ते जेवढय़ा वेळ नियम भंग करतील, त्या वेळेपर्यंत पाच हजार रुपये ते १५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.
पालिका हद्दीतील करोना रुग्ण संख्या १०० ते १५० या संख्येने वाढत आहे. शनिवारी १२४८ रुग्ण शहरात आढळले. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाच हजार २५८ झाली आहे. रुग्ण संख्या वाढ झपाटय़ाने होत असल्याने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी करोना प्रतिबंधाचे नियम मोडणाऱ्या सोसायटी पदाधिकाऱ्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा दिला.
सोसायटीमध्ये २५ टक्केपेक्षा अधिक रुग्ण सदनिकांमध्ये आढळून आले तर इमारतीमधील सर्व सदस्यांनी प्रतिजन चाचणी आणि आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे.