कल्याण-शीळ फाटा मार्गावर सोनारपाडा येथील ‘इंद्रप्रस्थ’ बीअर बारमध्ये बारबालांसोबत नृत्य करताना अश्लील हावभाव केल्यावरून मानपाडा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. संजय बाबर आणि रशीद मुलानी अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी ही कारवाई केली. या दोन कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी दिली.
पाच दिवसांपूर्वी साहाय्यक पोलीस आयुक्त कालिदास सूर्यवंशी यांनी सोनारपाडा येथील ‘इंद्रप्रस्थ’वर छापा टाकला होता. बारमधून १७ बारबालांसह २० जणांना पोलिसांनी अटक केली होती.
छाप्याच्या वेळी एक चित्रफीतही पोलिसांनी जप्त केली होती. त्यात मानपाडा पोलीस ठाण्यातील शोधकार्य विभागातील बाबर आणि मुलानी हे दोन हवालदार बारबालांसोबत अश्लील हावभाव, नृत्य करीत असल्याचे आढळून आले होते.
शीळ फाटा आणि नेवाळी परिसरात महिला सेवा देणारे सुमारे ६५ हून अधिक बार आहेत. पहाटेपर्यंत या बारमध्ये धिंगाणा सुरू असतो, अशी या परिसरातील रहिवाशांची तक्रार आहे. हा सारा प्रकार पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे बोलले जाते.
संग्रहित लेख, दिनांक 18th Apr 2015 रोजी प्रकाशित
बारबालांसोबत नृत्य करणारे दोन पोलीस निलंबित
कल्याण-शीळ फाटा मार्गावर सोनारपाडा येथील ‘इंद्रप्रस्थ’ बीअर बारमध्ये बारबालांसोबत नृत्य करताना अश्लील हावभाव केल्यावरून मानपाडा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले.
First published on: 18-04-2015 at 05:40 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Policeman caught dancing with bar girl suspended