ठाणे : रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक धनाजी राऊत यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वर्तकनगर येथील दोस्ती रेंटल इमारतीमध्ये धनाजी राऊत राहत असून ते अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून काम करत होते. सोमवारी त्यांनी परिसरातील एका निर्जनस्थळी जाऊन गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी धनाजी यांच्याकडे कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.