मध्य रेल्वेची बोंब सुरुच असल्याचं रोज पाहण्यास मिळतं आहे. आज ट्रान्स हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे लोकल खोळंबल्या आहेत. ठाणे ते ऐरोली दरम्यान अप मार्गावर जाणाऱ्या ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. स्पार्किंग झाल्याने ट्रेनमधले सगळे प्रवासी खाली उतरले. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेची बोंब सुरुच आहे. पाऊस पडला की मध्य रेल्वेचा खोळंबा होणं ठरलेलंच आहे. गेल्या आठ दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर अनेक ट्रेन्स १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहेत. आता आज ठाणे पनवेल, ठाणे वाशी मार्गावर म्हणजेच ट्रान्स हार्बर लोकल मार्गावर तांत्रिक बिघाड झाला आहे. स्पार्किंग झाल्याने प्रवासी ट्रेनमधून उतरले आहेत.
पेंटाग्राफ तुटल्याने हा बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरची ठाण्याहून वाशीला जाणाऱ्या लोकल सेवेचा खोळंबा झाला आहे. ट्रेनमधून स्पार्किंग झाल्याने प्रवासी खाली उतरून ट्रॅकवर चालू लागले. ठाण्याहून वाशीला जात असणाऱ्या ट्रेनच्या मार्गावर ऐरोली या ठिकाणी हा बिघाड झाला.