राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि कोमसाप यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवार-रविवारी १४ व १५ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आनंद विश्व गुरूकुल, रघुनाथ नगर, ठाणे (प.) येथे नवलेखकांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध लेखक मधु मंगेश कर्णिक आणि सुप्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचप्रमाणे प्रा. संजय बोरूडे, प्रा. उदय रोटे व डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो यांचे मार्गदर्शन उपस्थित श्रोत्यांना, नवोदित लेखकांना मिळणार आहे. सूत्र संचालनाची धूरा नीता माळी सांभाळणार असून चर्चा सत्रास प्रा. प्रदीप ढवळ, प्रा. दीपा ठाणेकर, बाळ कांदळकर, अशोक धोपेश्वर, मेघना साने, डॉ. महेश केळुसकर, प्रशांत डिंगणकर, नमिता कीर, रविंद्र आवटी, दत्तात्रय सैतवडेकर, गौरी कुलकर्णी, मनिष पाटील, वनिता शेळके, वैदैही जोशी, ज्योती शहाणे, सुनिला वैद्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two day program for fresh writers