शहापूर : धबधब्याखाली डोहात उतरलेल्या दोन तरुणांचा पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वांद्रे – खोर येथे घडली. कार्तिक पाटील (२२) व धनंजय गायकवाड (२२) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण तालुक्यातील कोलम येथे राहणारी राणी चौधरी या तरुणीकडे हैदराबाद येथून आलेला कार्तिक व मुरबाड येथील धनंजय दोघेही आले होते. तिघेही मंगळवारी तालुक्यातील पिवळी जवळील वांद्रे – खोर येथे फिरायला आले असताना खोर येथील धबधब्याखाली डोहात जाताना कार्तिकचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी धनंजय गेला असता दोघांनाही पोहता येत नसल्याने ते बुडाले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना पाण्याबाहेर काढण्यात आले. याबाबत वासिंद पोलीस अधिक तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two died after drowning in the waterfall shahapur amy