दोन कोटीचे सिगारेट चोरी प्रकरण

वालीव पोलीस ठाण्यातील २ कोटी रुपयांच्या सिगारेट चोरीच्या प्रकरणात वालीव पोलीस ठाण्यातील आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वालीव पोलीस ठाण्यात गुन्हात  जप्ती केलेल्या विदेशी कंपनीच्या सिगारेट चोरी प्रकारांत पोलीसचा सहभागी असल्याचे समोर आले होते या अगोदर वालीव पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक शरीफ रमजान शेख यांना अटक करणायत आली होती. याच प्रकारांत आणखी तपास केला असता बुधवारी संध्याकाळी पोलीस शिपाई  रवींद्र सुखदेव साबळे, आणि हेड कॉन्स्टेबल रामदास विठ्ठल चव्हाण यांना अटक करण्यात आले असल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी वसई अश्विनी पाटील यांनी दिली आहे. यामुळे या प्रकारांत आणखी काही पोलीस सहभागी असल्याची  चर्चा आता रंगत आहे.

वालीव पोलिसांनी  डिसेंबर २०१८ रोजी कारवाई करत विदेशी कंपनीच्या सिगारेट आणि अन्य तंबाखू  पदार्थ जप्त केले होते. यावेळी अन्न व औषध प्रसासनाने या मालाची किंमत ३ कोटी २४ लाख रुपये असल्याचे सांगितले होते.

हा मुद्देमाल वालीव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला होता. याच वेळी मुदेमाल नियंत्रण कक्षात ठेवण्यात आला होता.  याच निरीक्षकांनी याच मालावर हात साफ करत २ कोटी १६ लाखाचा माल विक्री केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.  या एकूण मुद्देमालात उदान गरम या कंपनीचे १५० गोण्या होत्या त्यातील १०० गोण्या  विकल्याचा आरोप झाला आहे.