ध्वनिप्रदूषण करणाऱ्या दुचाकीस्वारांना १००० रुपये दंड
सध्या बुलेटचे फॅड आहे. सायलन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश्श आवाज करत या बुलेट रस्तोरस्ती फिरतात. त्यांच्या फटफट आवाजाने ध्वनिप्रदूषण होते आणि त्याचा नागरिकांना नाहक त्रास होतो. वसई पोलिसांकडे याबाबत अनेक तक्रारी आल्याने त्यांनी बुलेटविरोधात कारवाई सुरू केली आहे.
वसई-विरार शहरात वेगाने मोटारसायकल चालविणाऱ्या मोटारसायकलवेडय़ांनी धुमाकूळ घातलेला आहे. त्यातच कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकलीेंचीे भर पडलीे आहे. तरुण मुले या बुलेटवरून कर्णकर्कश्श आवाज करत शहरात धुमाकूळ घालत असतात. बुलेटच्या सायलन्सरला रबर लावून बुलेटचा आवाज वाढवण्याचीे नवीेन फॅशन रूढ होत असून यामुळे नागरिकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचीे मागणी करण्यात आली होती. वसईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त योगेश कुमार यांनी याबबात वाहतूक पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी या बुलेटचालकांवर कारवाई सुरू केली आहे. बुलेटच्या सायलन्सरमध्ये रबर लावला की मूळ बुलेटच्या आवाजात जवळपास दहा पटीने आवाज वाढतो. त्यामुळे पोलिसांनी या बुलेटची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. तरुणांमध्ये बुलेटची क्रेझ आली आहे.
बुलेटचा आवाज वाढवल्याने सर्र्वाचे लक्ष वेधले जाते. विशेषत: मुलींमध्ये प्रभाव पाडण्यासाठी तरुण मुले असे प्रकार करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या आठवडय़ाभरात २५ हून अधिक बुलेटचालकांविरोधात कारवाई केलीे असून त्यांच्याकडून दहा हजारांहून अधिक दंड जमा केला आहे. मूळ आवाजात बदल करणे कायद्याने गुन्हा आहे. अशा चालकांविरोधात केंद्रीय मोटर वाहन नियम कलम १२० (सीएमवीआर) नुसार तसेच मोटार वाहतूक कायदा १९०(२) नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यांना पाचशे ते हजार रुपयांपर्यंत दंडाचीे तरदूत असते. ही कारवाई दररोज केलीे जाणार आहे.
– रणजीत पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग.