ज्येष्ठ निवेदक वसंत कुलकर्णी यांचे शुक्रवारी डोंबिवलीतील राहत्या घरी निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. वसंत कुलकर्णी यांना ‘व्हाईस ऑफ अमिन सयानी’ या टोपण नावाने ओळखले जायचे. वसंत कुलकर्णीनी मित्र शेरोशायर अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांच्या बरोबर शेरोशायरीचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.यांच्या जाण्याने एका चांगल्या निवेदक कलाकाराला आपण मुकलो आहोत, असे देशपांडे म्हणाले.