23-year-old salaried employee shares how he reaches Rs 50 lakhs net worth in Reddit post : अगदी कमी वयात यश मिळवल्याची अनेक उदाहरणे समाजात पाहायला मिळतात. तारुण्यात यश मिळण्यामागे या लोकांची अनेक दिवसांची मेहनत दडलेली असते. सोशल मीडियावर अशाच एका २३ वर्षीय तरुणाची चर्चा होत आहे. नोकरी करणाऱ्या एका २३ वर्षीय कर्मचाऱ्याने रेडिट वर पोस्ट करत खुलासा केला आहे की, त्याने इतक्या कमी वयात ५० लाख रूपयांची संपत्ती जमा केली आहे. त्याच्या २४ व्या वाढदिवसाला अगदी काही आठवडे शिल्लक असताना, त्याने हा टप्पा गाठला आहे. या वापरकर्त्याने हे शक्य होण्याचं श्रेय पूर्णपणे त्याच्या कमाईला दिले आहे, मात्र तो आणखी बचत करू शकला असता असंही म्हटलं आहे.
या रेडिटरने म्हटले आहे की, “मी अधिक आक्रमकपणे गुंतवणूक केली पाहिजे होती. माझ्या इच्छेपेक्षा मी थोडी जास्त उधळपट्टी केली. काही गुंतवणुकीच्या निर्णयांबद्दल आणि बचतीबद्दल मी थोडा निष्काळजी राहिलो. हे सर्व लक्षात घेता मी एक लाख रूपयांची अधिक बचत सहज करू शकलो असतो. मी तक्रार करत नाही, पण हा माझ्यासाठी एक धडा आहे.” त्याच्या गुंतवणुकीवर दोन वर्षांत मिळालेले एकूण परतावा १ लाखापेक्षा कमी असल्याचे त्याने नमूद केले आहे. यावरून त्याने स्पष्ट केले की, त्याच्या गुंतवणूक निवडींमुळे पोर्टफोलिओमध्ये विशेष भर पडली नाही.
त्याने त्याच्या संपत्तीबद्दल विसृतपणे माहिती दिली आहे. त्याने सांगितलं की त्याची गुंतवणूक म्युचुअल फंड- १०.३ लाख रुपये, चिट फंड – १.७ लाख रुपये, फिक्स्ड डिपॉझिट आणि इतर फिक्स्ड गुंतवणूक – १०.६ लाख रुपये, इंडिया स्टॉक्स (स्मालकेस) – ३.२ लाख रुपये, इंडिया स्टॉक्स (individual) – २.६ लाख रुपये आणि युएस स्टॉक्स (आरएसयू) -१६ लाख रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे हा वापरकर्ता आता त्याच्या गुंतवणुकीची पुनर्रचना करून म्युच्युअल फंडांमध्ये अधिक आक्रमकपणे गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.
सध्या तो कर भरल्यानंतर आरएसयू, मूळ वेतन आणि परफॉर्मन्स बोनस असे मिळून जवळपास ३० लाख रुपये कमवतो. पण सध्या तो कंपनी बदलण्याचा विचार करत आहे जेणेकरून तो ४५ लाख रुपये कमवू शकेल.