सध्या लोकांचे पगार प्रचंड वाढून देखील त्यांना पैसा परत नसल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. अशाच पद्धतीने एका २६ वर्षीय तरुणाने आपला पगार तिप्पट वाढूनही त्याला आर्थिक अडचणींचा समना करवा लादत असल्याची बाब एका Reddit पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. ४० हजार वरून १.३ लाख प्रति महिना पगार झाला, तरी अजूनही गरीब असल्यासारखे भावना आहे, असा मथळा देत त्याने ही पोस्ट लिहिली आहे. त्याने सांगितलं की, नोकरी बदलल्यानंतर त्याची कमाई तीन पट वाढली, मात्र तरीही अनेक आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे त्याला अजूनही त्याच ‘मिडल क्लास’ सापळ्यात अडकल्यासारखे वाटत आहे, असे या यूजरने म्हटले आहे.

नोकरीसाठी काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या एका शहरात गेलेल्या या तरुणाने त्याच्या अर्थिक अडचणींसाठी कुटुंबावर असलेले कर्ज आणि वडिलांचा वैद्यकीय खर्च ही दोन मुख्य कारणे असल्याचे सांगितले. “वडिलांना आधीपासून असलेल्या आजारामुळे आम्हाला कोणतीही खासगी आरोग्य विमा पॉलिसी मिळाली नाही. त्यामुळे आम्ही फक्त कॉर्पोरेट कव्हरेजवर अवलंबून आहोत.”

या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा आधीचा पगार ४०,००० रुपये होता,ज्याचा मोठा भाग हा इएमआय आणि रुग्णालयाच्या खर्चात जात असे. आता नवीन ठिकाणी लागलेल्या नोकरीमध्ये त्याला १.३ लाख दर महिना वेतन मिळते, पण असे असूनही त्याला हे पैसे पुरत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.

त्याने त्याच्या महिन्याच्या खर्चबद्दल माहिती देताना सांगितले की, “पीजीचे भाडे : २० हजार (मला माहिती आहे की हे खूपच जास्त आहे, पण हे माझ्या ऑफिसच्या जवळ आणि सोयीचे आहे आणि मी दुसरा स्वत्तातला पर्याय लवकरच शोधणार आहे). जेवण + ट्रान्सपोर्ट + इतर खर्च: ५ हजार रुपये. माझे इएमआय (वैद्यकीय कारणासाठी घेतलेले पर्सनल लोन) : २० हजार रुपये.पालकांचा ईएमआय: १५ हजार रुपये. घरी दिलेले पैसे : १० हजार. म्हणजे जवळपास ७० ते ७५ गहजार या निश्चित खर्चासाठ जातात.”

आता तीन पट जास्त कमवत असूनदेखील त्याला थोडीशीही चैन करता येत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. “कसलीच चैन नाही, कसला जीवनशैली सुधआरली नाही. मी प्रवासाचा खर्च टाळण्यासाठू भरपूर चालतो, अत्यंत काटकसरीने राहतो आणि जिथे शक्य असेल तिथे बचत करतो,” असे तो म्हणाला आहे.

पुढील वाटचालीसाठी त्याने आर्थिक नियोजन केले आहे ज्यामध्ये तो त्याचा मासिक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) २,००० रुपयांवरून १५,००० रुपयांपर्यंत वाढवणार आहे. याबरोबरच त्याच्या पालकांसाठी आरोग्य विमा घेणार आहे, त्याचे कर्ज लवकर फेडण्यासाठी त्याचे काही हप्ते वेळेच्या आधीच भरणआर आहे आणि पुढील दोन वर्षात लग्नासाठी बचत सुरू करणार आहे.

मात्र त्याने कर्ज आणि गुंतवूक यांच्यात समतोल साधताना अडचणी येत असल्याचे त्याने म्हटले आहे. “मी कर्ज फेडणे विरुद्ध गुंतवणूक यांच्यात समतोल कसा साधू शकतो? मी खरच सध्या एसआयपी १४ हजारापर्यंत वाढवली पाहिजे का की आधी कर्ज फेडण्यावर लक्ष केंद्रीत करावे?” असा प्रश्न त्याने पोस्टमध्ये विचारला आहे.

शेवटी त्याने इतरांशी तुलना केल्यानंतर मनात येणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत “स्थलांतरित झाल्यानंतर, माझ्या वयाच्या लोकांना इतक्या कमी कालावधीत इतके यश मिळवताना पाहून मी खूप भारावून जातो,” असे त्याने लिहिले.

या पोस्टच्या खाली अनेकांनी या तरूणाला वेगवेगळे सल्ले दिले आहेत, तर अनेकांनी धीर देखील दिला आहे. एका वापरकर्त्याने गुंतवणूक करण्याऐवजी कर्ज फेडण्यास प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. तसेच लग्न अजून काही काळ थाबवले जाऊ शकते असेही त्याने सांगितले आहे. आधीचे काही आजार असलेल्या पालकांसाठी आरोग्य विमा खरेदी करणे नेहमीच महागडे असते असेही त्याने सांगितले. त्यामुळे स्वतःतली पॉलिसी घेणे टाळावे, कारण तसे केल्याने क्लेम नाकारला जाण्याची शक्यता असते असेही या वापरकर्त्याने सांगितले. स्वतःची इतरांशी तुलना न करण्याचा सल्ला दुसऱ्या एका वापरकर्त्याने दिला आहे.