39 years old cardiac surgeon dies of cardiac arrest during rounds at hospital in Chennai : चेन्नई येथील एका ३९ वर्षांच्या एका डॉक्टरचा रुग्णालयात राउंडवर असताना मृत्यू झाल्याच्या घटनेची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. याबद्दल न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी एक्सवर पोस्ट करत या कार्डियक सर्जन असलेल्या डॉक्टरचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान रुग्णालयात असताना मृत्यू झाल्याने डॉक्टरांच्या कामाचे तास आणि त्यांचे जीवनशैली या मुद्द्यावर सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
जेव्हा बरे करणारा कोसळतो, तेव्हा डॉक्टरांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी ही एक चेतावणी असते असे डॉक्टर कुमार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. काल सकाळी हृदयद्रावक बातमी आली. ३९ वर्षांचे कार्डियक सर्जन डॉ. ग्रॅडलिन रॉय रुग्णालयातील वॉर्ड राउंड करत असताना कोसळले. सहकाऱ्यांनी शूरपणाने लढा दिला—सीपीआर, तातडीने स्टेंटिंग याच्यासह अँजिओप्लास्टी , इंट्रा-आओर्टिक बॅलून पंप, अगदी ECMO देखील करण्यात आले. पण डाव्या मुख्य आर्टरीच्या १०० टक्के ब्लॉकेजमुळे आलेला अत्यंत तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने झालेले नुकसान भरून काढता आले नाही. मी मनातू संवेदना व्यक्त करतो. ओम शांती, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुढे डॉक्टर कुमार यांनी अशा पद्धतीने डॉक्टरांना जास्त प्रमाणात हृदयविकारांना तोंड द्यावे लागण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत? याबद्दल देखील माहिती दिली आहे. दीर्घ आणि अनियमित कामाचे तास, अनहेल्दी आहाराचे पद्धती, बैठी जीवनशैली, मानसिक ताण, खूप जास्त ताणाव वाढणे, जास्त प्रमाणात धुम्रपान आणि मद्यपान करणे आणि प्रतिबंधात्मक काळजी घेण्याकडे दुर्लक्ष, अशी कारणे त्यांनी सांगितली आहेत.
पुढे त्यांनी डॉक्टरांनी त्यांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी दररोजच्या जीवनशैलीत काही बदल करावेत असेही सुचवले आहे, ज्यामध्ये त्यांनी जास्त तास काम करण्यास नकार द्यावा असे म्हटले आहे. तसेच विरोधाभास उघड आहे: जे इतरांच्या हृदयांची काळजी घेण्यासाठी आपले जीवन समर्पित करतात, ते आपल्याच हृदयाकडे दुर्लक्षकरत आहेत, असे डॉक्टर कुमार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. या पोस्टच्या खाली लोक मोठ्या संघ्येने कमेंट्स करताना दिसत आहेत. अनेकांनी डॉक्टरांच्या मृत्यूवर संवेदना व्यक्त केल्या आहेत.