Viral Video : महाकुंभ मेळ्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. ४० दिवस चालणाऱ्या या कुंभमेळ्यात अनेक साधु साध्वी तसेच भाविक सहभागी होतात. या कुंभ मेळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका सुंदर साध्वीशी एक पत्रकार संवाद साधताना दिसत आहे. या सुंदर साध्वीची कहाणी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. या साध्वीचा व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आला आहे. (a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous video goes viral on social media)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक साध्वी दिसेल. ती रथामध्ये बसलेली आहे . व्हिडीओत पुढे तुम्हाला दिसेल की एक पत्रकार साध्वीबरोबर संवाद साधते.
पत्रकार – तुम्ही कुठून आला आहात?
साध्वी – उत्तराखंडहून आलेली आहे आणि आचार्य महामंडलेश्वर यांची शिष्या आहे.
पत्रकार – तुम्ही इतक्या सुंदर आहात मग तुम्ही संन्यासचे आयुष्य का निवडले? तुमची कधी इच्छा झाली नाही का की साध्वी जीवन सोडून पुढे काही करायचं?
साध्वी – मला जे करायचं होतं ते सर्व काही सोडून मी येथे आली आहे.
पत्रकार – या जीवनात काय आहे की तुम्ही हा मार्ग निवडला?
साध्वी – या मार्गावर मला संतुष्टी मिळाली.
पत्रकार – तुमचे वय किती? आणि किती वर्षापासून तुम्ही या साध्वीचे आयुष्य स्वीकारले?
साध्वी – मी ३० वर्षाची आहे. मागील दोन वर्षांपासून मी हे जीवन जगत आहे.

हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”

pyari_shubhi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ही रश्मिका मंदाना सारखी दिसतेय” तर एका युजरने लिहिलेय, “लोक ट्रोल का करत आहे. ती खूप आनंदी आहे आयुष्यात” आणखी एका तरुणाने लिहलेय, “साध्वीमध्ये साधेपणा कुठे दिसत आहे?” अनेक युजर्सनी या साध्वीला मेकअपमुळे ट्रोल केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous video goes viral on social media ndj