Viral Video : लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रीन नृत्य म्हणून लावणी सगळीकडे प्रसिद्ध आहे.सोशल मीडियावर लावणी करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका चिमुकलीचा सुद्धा लावणी करतानाचा सुंदर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चिमुकलीची लावणी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली सुंदर लावणी करताना दिसत आहे. मी साताऱ्याची गुलछडी या गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे. तिने सुंदर नऊवारी नेसली आहे. नऊवारीत ती स्टेजवर लावणी सादर करत आहे. तिच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव पाहून तुम्हीही तिचे चाहते व्हाल. सध्या या तुफान लावणीचा व्हिडीओ चांगलाचा चर्चेत आहे.
rajdancer2021 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नेत्रा स्पेशल डान्स साताऱ्याची गुलछडी”
हेही वाचा : Personality Test : तुम्हाला कोणता चेहरा आनंदी दिसतो? उत्तरावरुन कळेल तुमचा स्वभाव अन् व्यक्तिमत्त्व
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ताई खूप छान डान्स करते” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर” आणखी एका युजरने लिहिलेय, “डान्स स्टेप्स आणि हावभाव खूप छान” काही युजर्सनी या चिमुकलीचे वय सुद्धा विचारले आहेत.
नेत्रा शितोळे असे या चिमुकलीचे नाव असून तिचे वडील तिचे अनेक डान्सचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.