Video : सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका दारुड्याचा चप्पल घालतानाचा संघर्ष दाखवला आहे.
आपल्या भारतात अनेकांना दारूचे व्यसन असते. खरं तर दारूचे व्यसन हे शरीरासाठी चांगले नाही, तरीसुद्धा काही लोक दारूचे व्यसन करतात आणि दारूचे सेवन अति प्रमाणात केल्यामुळे या लोकांना अनेकदा रस्त्याने नीट चालताही येत नाही आणि बोलताही येत नाही.

या व्हायरल व्हिडीओमध्येसुद्धा हेच चित्र दिसत आहे. एका दारुड्याचा हा व्हिडीओ आहे. पावसाळी वातावरण असल्यामुळे सगळीकडे पाणी साचलेले व्हिडीओत दिसत आहे. या दारुड्याला चप्पल घालायची आहे, पण त्याने इतके जास्त दारूचे सेवन केले आहे की त्याला नीट उभेही राहता येऊ शकत नाही. सुरुवातीला दोनदा चप्पल घालण्याचा प्रयत्न करताना त्याचा तोल जातो. त्यानंतर तो हाताने चप्पल धरून घालण्याचा प्रयत्न करतो, पण खाली कोसळतो. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : धो धो पावसात भर रस्त्यावर निवांत गप्पा मारत बसल्यात या महिला, नेटकरी म्हणतात, “कोणत्या विषयावर चर्चा करताहेत?”

marathi_mann_07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शन आहे, “चप्पल घालण्यासाठी केवढा तो संघर्ष.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “त्याची काहीही चूक नाही, चप्पल जागेवर थांबत नाही”, तर एका युजरने लिहिले, “शेवटपर्यंत काय चप्पल घालता आली नाही; किती तो आटापीटा.” आणखी एका युजरने लिहिले, “नाद खुळा”, व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.